जंगलात होती कित्येक वर्षे जुनी विहीर, त्यात टाकला कॅमेरा; VIDEO पाहून सगळ्यांचा थरकाप उडाला
- Published by:Priya Lad
Last Updated:
जंगलातील जुन्या विहिरीत कॅमेरा पाठवल्यानंतर कॅमऱ्यात जे दृश्य कैद झालं ते थरारक आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून घाबरले आहेत.
नवी दिल्ली : पूर्वी लोक पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी बांधत असत. स्वयंपाक, पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी विहिरीतीलच पाण्याचा वापर केला जात असेल. नंतर कूपनलिका, नळ याने पाणी पुरवठा सुरू झाल्याने विहिरींचं महत्त्व हळूहळू कमी होत गेले. अनेकांनी आपल्या विहिरी बंद केल्या, पण काही विहिरी आजही अस्तित्वात आहेत. अशीच एक कित्येक वर्षे जुनी विहीर जंगलाच्या मध्यभागी सापडली. यात विहिरीत कॅमेरा टाकला असता धक्कादायक दृश्य कैद झालं आहे.
असे काही लोक आहेत ज्यांना जुन्या गोष्टींचा अभ्यास करायला आवडत. अमेरिकेतील अशीच एक व्यक्ती, अमेरिकेन युट्युबर अॅक्वाचिगरने मे 2022 मध्ये त्याच्या युट्युब चॅनेलवर जंगलाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. युट्युबरने व्हिडीओमध्ये या विहिरीबाबत माहितीही दिली आहे. ही खूप जुनी दगडी विहीर आहे. जी खडक कापून बनवण्यात आली आहे. जंगलाच्या मध्यभागी बांधलेली विहीर झाकलेली आहे. जेणेकरून त्यात कोणताही प्राणी पडू शकत नाही.
advertisement
व्हिडिओच्या सुरुवातीला तो लाईट लावून विहिरीच्या आत पाहण्याचा प्रयत्न करतो, पण विहीर खूप खोल आहे. विहिरीच्या आत काय आहे हे पाहण्यासाठी या व्यक्तीने त्यात कॅमेरा टाकला. त्याने या विहिरीच्या आत गो प्रो कॅमेरा पाठवला. या कॅमेऱ्यात धक्कादायक दृश्य कैद झालं आहे.
advertisement
विहिरीच्या आत काय होतं?
विहीर झाकलेली होती तरी आतमध्ये भीतीदायक प्राणी दिसले. कदाचित थोड्याशा जागेतून ते विहिरीत गेले असावेत आणि या विहिरीलाच आपलं घर बनवलं. Aquachigger युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
advertisement
या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. बरेच लोक घाबरले आहेत. एका युझरने हा मरणाचा भयंकर मार्ग असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने मला कोणी कितीही पैसे दिले तरी मी या भयानक विहिरीच्या आत जाणार नाही, असं म्हटलं आहे. तर काहींनी विहिरीच्या रचनेचंही कौतुक केलं आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
August 01, 2024 9:04 AM IST
मराठी बातम्या/Viral/
जंगलात होती कित्येक वर्षे जुनी विहीर, त्यात टाकला कॅमेरा; VIDEO पाहून सगळ्यांचा थरकाप उडाला


