'तू तुझ्या देशात जा', ब्रिटनमध्ये भारतीय तरुणीवर दोघांचा अत्याचार, आधी मारहाण केली मग...

Last Updated:

ब्रिटनमधील वेस्ट मिडलँड्समधील ओल्डबरी शहरात एका २० वर्षीय भारतीय तरुणीवर वांशिक हल्ल्याची आणि बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18
News18
लंडन : ब्रिटनमधील वेस्ट मिडलँड्समधील ओल्डबरी शहरात एका २० वर्षीय भारतीय तरुणीवर वांशिक हल्ल्याची आणि बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या मंगळवारी (९ सप्टेंबर) सकाळी टेम रोडजवळ ही घटना घडली असून, पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, दोन गोऱ्या पुरुषांनी तिच्यावर हल्ला केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी आरोपींनी तिला उद्देशून वांशिक शेरेबाजी करत 'तू तुझ्या देशात परत जा' अशी धमकीही दिली.
या गंभीर घटनेने ब्रिटनमधील भारतीय समुदायात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या घटनेला 'वांशिकदृष्ट्या प्रेरित' हल्ला मानले असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जनतेची मदतही मागितली. संशयित आरोपी स्थानिक असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यापैकी एकाने गडद रंगाचा स्वेटशर्ट परिधान केला होता आणि त्याने टक्कल केलं होतं, अशी माहिती पीडितेने दिली आहे.
advertisement
सँडवेल पोलीस प्रमुख अधीक्षक किम मॅडिल यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, "आम्ही या प्रकरणाची संपूर्ण गांभीर्याने चौकशी करत आहोत. सीसीटीव्ही फुटेज तपासणे, फॉरेन्सिक तपास करणे आणि इतर सर्व आवश्यक तपास सुरू आहेत. आम्ही पीडित तरुणीला सर्वतोपरी मदत करत आहोत आणि तिला मानसिक आधार देत आहोत."
advertisement
या घटनेमुळे ब्रिटनमधील वांशिक भेदभावाचा आणि द्वेषाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्थानिक भारतीय समुदायाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हा एक 'लक्ष्यित हल्ला' असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
'तू तुझ्या देशात जा', ब्रिटनमध्ये भारतीय तरुणीवर दोघांचा अत्याचार, आधी मारहाण केली मग...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement