सौरभचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरणारी मुस्कान झाली आई, बाळ कुणाचं? DNA चाचणीची मागणी

Last Updated:

नवऱ्याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह हा घरात पाण्याच्या निळ्या ड्रममध्ये लपवला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती.

News18
News18
काही महिन्यांपूर्वी सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणामुळे अवघा देश हादरला होता. सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगी एका तरुणाच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोघांच्या अनैतिक संबंधात नवरा अडथळा येत होता म्हणून दोघांनी त्याचा खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह हा घरात पाण्याच्या निळ्या ड्रममध्ये लपवला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. मुस्कानने ज्या प्रकारे नवऱ्याचा खून केला त्यावरून तिला ड्रम क्विन असं म्हटलं जाऊ लागलं. पण, आता जेलमध्ये असलेल्या मुस्कानने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे ही मुलगी कुणाची आहे? यासाठी राजपूत कुटुंबीयांनी डीएनए चाचणीची मागणी केली आहे.
4 मार्च 2025 मध्ये  उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरण घडलं होतं. सौरभची पत्नी मुस्कान गर्भवती होती आणि तिची तब्येत बिघडल्यानंतर तिला काही दिवसांपूर्वीच मेरठमधील एलएलआरएम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं होतं.  तुरुंगात असताना तिची तब्येत सतत खालावत गेली, त्यामुळे तिला कडक सुरक्षेत स्त्रीरोग वॉर्डमध्ये दाखल करावं लागलं होतं. सोमवारी मुस्कानची नॉर्मल डिलिव्हरी झाली,तिने एका मुलीला जन्म दिला.  विशेष म्हणजे, मृत सौरभचा त्या दिवशी वाढदिवस होता, त्याच दिवशी मुस्कानने मुलीला जन्म दिला.
advertisement
दरम्यान, आरोपी मुस्कानने तब्येतीची कारणं देत अनेक वेळा तुरूंग अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर तिला मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. आता मुस्कानची प्रसूती पूर्णपणे सुरक्षित झाली आणि बाळ निरोगी आहे. प्रसूती कक्षातील डॉक्टरांनी सांगितलं की, मुस्कानने संध्याकाळी ६:५० वाजता सामान्य बाळाला जन्म दिला आणि सध्या ती वैद्यकीय देखरेखीखाली आहे.
मृत सौरभ राजपूतच्या कुटुंबाने केली DNA चाचणीची मागणी 
पण आता नवीन पपेच निर्माण झाला आहे. मुस्कानने मुलीला जन्म दिला आहे. पण, ही मुलगी कुणाची आहे, असा प्रश्न मृत सौरभ राजपूतच्या कुटुंबीयांनी उपस्थितीत केला आहे. त्यामुळे मृत सौरभच्या कुटुंबाने नवजात बाळाच्या डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे.
advertisement
"जर डीएनए चाचणीत मुलगी आमच्या कुटुंबातील असल्याचं सिद्ध झालं तर आम्ही तिला दत्तक घेऊ आणि संगोपन करू" असं मृत सौरभ राजपूतच्या भावाने सांगितलं. तसंच, सत्य जाणून घेणं महत्वाचं आहे, कारण हे प्रकरण संवेदनशील आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचं आहे. मुस्कानवर कडक देखरेख आहे, कुटुंब डीएनए चाचणीची वाट पाहत आहे. मुस्कानला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल्यापासून सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी वॉर्डबाहेर तैनात आहेत आणि बाहेरील लोकांना तिला भेटण्याची परवानगी नाकारली आहे.
advertisement
DNA चाचणीकडे लक्ष
कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाईल आणि आई आणि बाळाला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवलं जाईल. सौरभ खून प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि मुस्कान न्यायालयीन कोठडीत आहे. पण, मुलीच्या जन्मामुळे या प्रकरणात एक नवीन वळण आलं आहे. आता सर्वांच्या नजरा येणाऱ्या डीएनए अहवालावर आणि कायदेशीर कारवाईवर लागल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
सौरभचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरणारी मुस्कान झाली आई, बाळ कुणाचं? DNA चाचणीची मागणी
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement