Thane Crime: ठाणे पालिसांची मोठी कारवाई, तब्बल 2,38,87,950 रुपयांचे अमली पदार्थ जप्त
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane Crime: ठाणे पोलिसांना अंमली पदार्थ विरोधी कारवाईत मोठं यश मिळालं. नुकतेच केलेल्या थेट कारवाईत तब्बल 2 कोटी 38 लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे.
ठाणे: अंमली पदार्थांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल 2 कोटी 38 लाख 87 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात 2 किलो 374 ग्रॅम वजनाचा हायब्रीड गांजा (विड्स) सह 19 एमडीएमए गोळ्यांचा समावेश आहे. 24 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी मुंब्र्यातील सिम्बॉयसिस शाळेच्या समोर ही कारवाई केली. यामध्ये मूळच्या राजस्थानातील सुमित राजुराम कुमावत या 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ठाणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ठाणे पोलिसांना हायब्रीड गांजा आणि एमडीएमए टॅबलेट्स या अंमली पदार्थांची विदेशातून भारतात तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार ठाणे पोलिसांनी 24 ऑगस्ट रोजी सापळा रचून थेट कारवाई केली. मुंब्रा येथील जुना टोलनाका, बायपास रोडवरील सिम्बॉयसिस शाळेच्या समोरून बोरिवलीतील तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 2 कोटी 37 लाख 40 हजार रुपये किमतीचा 2 किलो 374 ग्रॅम वजनाचा हायब्रीड गांजा आणि 1 लाख 47 हजार रुपयांच्या 19 एमडीएमए टॅबलेट्स आढळल्या. पोलिसांनी तब्बल 2 कोटी 38 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
advertisement
याप्रकरणातील आरोपी मूळचा राजस्थानातील जैसलमेर येथील असून तो सध्या मुंबईतील बोरिवली परिसरात वास्तव्यास आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातून अंमली पदार्थांच्या तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट समोर येण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ठाणे पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या विशेष पथकाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार सदर कारवाई केली.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
August 29, 2025 2:53 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Thane Crime: ठाणे पालिसांची मोठी कारवाई, तब्बल 2,38,87,950 रुपयांचे अमली पदार्थ जप्त


