Jalna: देवदर्शनाला जात असताना गाडी थांबवली, 2 लाख रकमेसह दागिने घेऊन नवरी पळाली, जालन्यातील घटनेनं खळबळ

Last Updated:

तरुणांना फसवणूक करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील राजूर येथे अशीच फसवणुकीची एक घटना समोर आली असून 2 लाख रुपये रोख आणि दागिन्यांसह नवरीने पळ काढला आहे.

लुटेरी दुल्हन
लुटेरी दुल्हन
जालना : लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याने ग्रामीण भागामध्ये अनेक विवाह इच्छुक तरुणांना इच्छा असूनही लग्न करता येत नाही. याच परिस्थितीचा फायदा घेत जालना जिल्ह्यामध्ये अशा तरुणांना फसवणूक करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील राजूर येथे अशीच फसवणुकीची एक घटना समोर आली असून 2 लाख रुपये रोख आणि दागिन्यांसह नवरीने पळ काढला आहे.
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील खामखेडा येथील अनिल फदाट हे भावासाठी मुलगी पाहत होते. त्यांच्या ओळखीतील एकाने मुलगी आहे असे सांगितले होते. त्यानुसार मुलींकडच्यांनी घरी येऊन मुलाला पसंत केले. मुलगी पाहून देतो म्हणून एजंटाने काही रक्कम द्यावी लागेल, लग्न तुम्हालाच लावावे लागेल, असे सांगितले.
advertisement
मुलाच्या भावाने अट मान्य करून लग्नास होकार दिला. मुलीचे स्थळ पाहून देणाऱ्याला रक्कमही दिली. खामखेडा गावात 9 मे रोजी रात्री उशिरा लग्न लागले. दुसऱ्या दिवशी मुलीला राजूर येथे दर्शनासाठी घेऊन जायचे म्हणून नवरदेव, नवरी आणि तिची बहीण जात होते. राजूर रोडवर नवरीने थोडं थांबा म्हणून गाडी थांबवली. त्याच गाडीजवळ असलेल्या दुसऱ्या गाडीत नवरी आणि तिची बहीण बसून पसार झाल्या.
advertisement
नवरी आणि तिची बहीण पळून गेल्यानंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात अनिल फदाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रूपाली मंगेश भारती (अमरावती), राणी, कल्याण मजहर कुरेशी (राळेगाव), शेख पाशा शेख पाशू जाफराबाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पैसे घेऊन लग्न लावायचे आणि नंतर पैसे दागिने घेऊन पसार व्हायचे, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. 9 मे रोजी लग्न लागल्यानंतर 10 मे रोजी चारचाकी वाहनाने देवदर्शनाला जात असताना नवरीने एका ठिकाणी गाडी थांबवली. त्यानंतर दुसऱ्या गाडीत बसून नवरी आणि तिची बहीण रोख रक्कम आणि दागिने असा 2 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेल्या. ही घटना राजूर रोडवर घडल्यानंतर या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Jalna: देवदर्शनाला जात असताना गाडी थांबवली, 2 लाख रकमेसह दागिने घेऊन नवरी पळाली, जालन्यातील घटनेनं खळबळ
Next Article
advertisement
BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

  • मेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला

  • काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत

View All
advertisement