13 वर्षांची मुलगी बनली आई, 18 वर्षांचा पती फरार! त्यांच्या लग्नाचं कारण ऐकून पोलिसांना बसला धक्का

Last Updated:

जयपूरमध्ये एका 13 वर्षांच्या मुलीने बाळाला जन्म दिल्याने खळबळ उडाली आहे. प्रसूतीनंतर मुलीचे वय 13 वर्षे असल्याचे समजताच रुग्णालयातील डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. तपासणीत मुलीवर...

Shocking News
Shocking News
पालक होणं हे कोणत्याही जोडप्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट असते. मुलाचा जन्म झाल्याने पती-पत्नीच्या नात्यात आणखी घट्टपणा येतो. सहसा जेव्हा एखादं जोडपं आई-वडील होतं, तेव्हा लोक त्यांना आधी शुभेच्छा देतात, पेढे वाटून आनंद साजरा करतात. पण, जयपूरमध्ये एका जोडप्याला आई-वडील झाल्याचं कळताच थेट पोलीस धावत आले. पोलिसांनी नाही, तर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीच पोलिसांना बोलावलं होतं. कारण, ज्या मातेने बाळाला जन्म दिला होता, तिचं वय फक्त 13 वर्ष आढळून आलं आणि बाळाच्या पित्याचं वय केवळ 18 वर्ष होतं!
आई-वडिलांनी परिस्थितीमुळे नाईलाजाने दिला होकार
राजस्थानच्या जयपूरमधील शास्त्रीनगर पोलीस या गंभीर प्रकरणाचा तपास करत आहेत. इथल्या एका हॉस्पिटलमध्ये एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. ही मुलगी अवघी 13 वर्षांची आहे, तर बाळाचा पिता (आरोपी) 18 वर्षांचा आहे. मुलीची अवस्था नाजूक असल्याने डॉक्टरांनी खूप कठीण परिस्थितीत बाळाची डिलिव्हरी केली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना या धक्कादायक प्रकरणाबद्दल माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे की, या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. जेव्हा कुटुंबियांना त्यांच्या मुलीच्या गर्भधारणेबद्दल कळलं, तेव्हा आरोपी (बलात्कार करणारा तरुण) याने मुलीच्या कुटुंबियांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, ज्याला मुलीच्या आई-वडिलांनी परिस्थितीमुळे नाईलाजाने होकार दिला.
advertisement
कुटुंब कामासाठी जयपूरला आलं होतं
बाळाच्या जन्मानंतर, डॉक्टरांनी मुलीचं वय तपासलं. तेव्हा त्यांना धक्का बसला, कारण मुलीचं वय फक्त तेरा वर्ष होतं. अशा परिस्थितीत, तिच्या इतक्या कमी वयाच्या मानाने ही गर्भधारणा आणि प्रसूती खूपच गुंतागुंतीची होती. डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना या गंभीर प्रकरणाची माहिती दिली. पोलीस तपासात असंही समोर आलं की, मुलगी आणि तिचं कुटुंब कामासाठी बिहारहून जयपूरला आलं होतं. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने या मुलीच्या अल्पवयीनपणाचा फायदा उचलत तिच्यावर बलात्कार केला होता. जेव्हा मुलगी गर्भवती झाली, तेव्हा त्याने कुटुंबियांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि नाईलाजाने का होईना, दोघांचं लग्न झालं.
advertisement
आरोपी पती फरार
अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर हॉस्पिटलमधील डॉक्टरही प्रचंड हादरले. त्यांनी तात्काळ पोलिसांना या धक्कादायक प्रकरणाची माहिती दिली. तेव्हापासून आरोपी तरुण फरार आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईचा जबाब नोंदवून घेतला आहे. यासोबतच, फरार झालेल्या आरोपीचा कसून शोधही सुरू आहे. हॉस्पिटलच्या फॉर्मवर, बाळाच्या वडिलांच्या नावाऐवजी आरोपी तरुणाचं नाव लिहिलं आहे. असं सांगितलं जात आहे की, या तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि ती गर्भवती झाल्यावर गुन्हा लपवण्यासाठी तिच्याशी लग्न केलं.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
13 वर्षांची मुलगी बनली आई, 18 वर्षांचा पती फरार! त्यांच्या लग्नाचं कारण ऐकून पोलिसांना बसला धक्का
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement