आई नव्हे, ही तर कैदाशीन! 2 वर्षांच्या चिमुकल्याला फेकलं तलावात, म्हणते, 'हे मूल भुता-प्रेताचं होतं'

Last Updated:

11 मेच्या रात्री 10 वाजता 38 वर्षीय मेघा नावाच्या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला कालव्यात फेकले. ही घटना एका महिलेनं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर...

Crime News
Crime News
एका मातेने आपल्या अवघ्या 2 वर्षांच्या मुलाला चक्क कालव्यात फेकून दिलं! धक्कादायक बाब म्हणजे, मुलाला कालव्यात फेकताना ही महिला तिथून जाणाऱ्या एका दुसऱ्या महिलेने प्रत्यक्ष पाहिलं. यानंतर, तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी क्रूर मातेला ताब्यात घेतलं असून, सध्या कालव्याच्या पाण्यात त्या निरागस मुलाचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही घटना हरयाणातील फरीदाबादमध्ये घडली.
जादूटोणा आणि तंत्र-मंत्राची चर्चा
या प्रकरणात जादूटोणा आणि तंत्र-मंत्राची चर्चा होत असून, आरोपी महिलेची मानसिक स्थितीही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. मात्र, पोलिसांनी सांगितलं की, प्रत्यक्षदर्शींच्या माहिती आणि जबाबाच्या आधारावरच प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण दुर्दैवी घटना रविवारी रात्री 10 वाजता घडली.
मुलाला घेऊन आई गायब झाली होती आई
बीपीटीपी चौकाजवळ असलेल्या आग्रा कालव्याच्या पाण्यात एका महिलेने आपल्या मुलाला फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच बीपीटीपी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेला ताब्यात घेतलं. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 38 वर्षीय महिलेचं नाव मेघा असं आहे. मेघा ही फरीदाबादमधील सैनिक कॉलनी, एच ब्लॉक येथे राहणारी असून ती गृहिणी आहे. 11 मे च्या संध्याकाळी मेघा अचानक आपल्या 2 वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन घरातून कुठे तरी निघून गेली होती. कुटुंबियांनी तिचा खूप शोध घेतला होता, पण ती कुठेही सापडली नव्हती.
advertisement
एका महिलेने पाहिलं आणि पोलिसांना सांगितलं
मेघाला आपल्या मुलाला कालव्यात फेकताना एका महिलेने प्रत्यक्ष पाहिलं. या प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की, त्या वेळी त्या त्यांच्या मुलीला सोडायला जात होत्या. त्यांनी मेघाला मुलाला कडेवर घेऊन कालव्यावर उभे पाहिले. त्यांच्या डोळ्यादेखत काही क्षणातच मेघाने त्या चिमुकल्या मुलाला कुठलाही विचार न करता कालव्याच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यात फेकून दिलं. हा प्रकार पाहून त्यांना मोठा धक्का बसला. यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांना या भयानक घटनेची माहिती दिली.
advertisement
तो जिन्नचा मुलगा होता, म्हणून फेकून दिलं; जादूटोण्याचा संशय
या घटनेमागे जादूटोणा किंवा तंत्र-मंत्राचा काही प्रकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस म्हणतात की, आम्ही या दिशेने देखील तपास करत आहोत. महिलेने सुरुवातीला पोलिसांना असं सांगितलं होतं की, "तो जिन्नचा (भूत-प्रेत) मुलगा होता, म्हणून तिने त्याला फेकून दिलं", पण नंतर तिने हे विधान बदललं. महिलेचा पती कपिल लुक्रा हे एका खाजगी कंपनीत कामाला आहेत.
advertisement
महिलेची मानसिक स्थिती बिघडलेली होती, उपचार सुरू होते
बीपीपी पोलीस ठाण्याचे प्रभारी अरविंद यांनी सांगितलं की, आरोपी महिलेची मानसिक स्थिती बिघडलेली होती. तिच्यावर गेल्या बऱ्याच दिवसांपासून मानसिक उपचारासाठी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात महिलेने आपल्या मुलाला कालव्याच्या पाण्यात फेकल्याचं समोर आलं आहे आणि याला प्रत्यक्षदर्शींचाही दुजोरा आहे. सध्या युद्धपातळीवर मुलाचा कालव्याच्या पाण्यात शोध सुरू आहे. पोलीस म्हणतात की, संपूर्ण प्रकरणाचा आम्ही गांभीर्याने आणि विविध कोनातून तपास करत आहोत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
आई नव्हे, ही तर कैदाशीन! 2 वर्षांच्या चिमुकल्याला फेकलं तलावात, म्हणते, 'हे मूल भुता-प्रेताचं होतं'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement