'तुम्ही मला मत का नाही दिलं?', या रागातून सरपंचाने घेतला सेवानिवृत्त कॅप्टनचा जीव, मुलगा म्हणाला...

Last Updated:

मुळोडी गावात 10 मे रोजी सेवानिवृत्त आर्मी कॅप्टन रामसिंह यांची निर्घृण हत्या करण्यात आली. सरपंच प्रविण आणि त्याच्या तीन साथीदारांनी रात्री त्यांच्या घरात घुसून लाठ्यांनी मारहाण...

retired army captain murde
retired army captain murde
सेवानिवृत्त लष्करी कॅप्टन राम सिंह यांची त्यांच्या घरात घुसून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी सेवानिवृत्त कॅप्टनवर प्रथम काठ्यांनी बेदम हल्ला केला आणि मारहाण करून त्यांचा जीव घेतला. पोलिसांनी मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून गावाचा सरपंच आणि इतर तीन आरोपींविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यात आरोपी आणि मृतकाचे कुटुंबीय यांच्यात भांडण किंवा झटापट होताना दिसत आहे. ही धक्कादायक घटना हरयाणातील नारनौल जिल्ह्यातील मुलौडी गावात घडली.
घरात घुसून केली जबर मारहाण अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 10 मे च्या रात्री घडली. रात्रीच्या सुमारास आरोपी एका चारचाकीतून आले आणि सेवानिवृत्त कॅप्टनच्या घरात घुसले. घरात प्रवेश करण्यासाठी एका आरोपीने घराच्या भिंतीवरून उडी मारली आणि आतून दरवाजा उघडला. यानंतर, सर्व आरोपींनी मिळून राम सिंह यांना काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली, ज्यामुळे राम सिंह यांचा जागेवरच मृत्यू झाला. यावेळी, कुटुंबातील सदस्यांनी पाहिले की, आरोपी सरपंचाने इतरांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
advertisement
घटनेचा व्हिडीओ महत्त्वाचा पुरावा
सेवानिवृत्त कॅप्टन राम सिंह यांचा मुलगा रामलालने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, मुलौडी गावाचा सरपंच प्रवीण याचा त्यांच्या कुटुंबाशी विधानसभा निवडणुकीच्या वेळेपासूनच वाद किंवा वैर होतं. दुसरीकडे, घटनेच्या वेळी मृताच्या एका नातेवाईकाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला असून तो पोलिसांना महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर केला आहे. आरोपी घटनास्थळावरून पळून जात असताना सरपंचाच्या आधार कार्डवरील माहिती आणि त्याचा फोन नंबर लिहिलेली एक चिठ्ठी तिथे पडली होती, असंही सांगितलं जातंय.
advertisement
सरपंच साथीदारांसोबत आला होता
सेवानिवृत्त कॅप्टन राम सिंह यांचा मुलगा रामलालने सांगितलं की, सरपंचाने आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून त्यांच्या वडिलांची हत्या केली. मुलाने पुढे सांगितलं की, त्यांनी आरोपी सरपंचाला निवडणुकीत मत दिलं नव्हतं आणि याच कारणामुळे सरपंच त्यांच्यावर खूप रागावला होता आणि यापूर्वीही त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
नांगल चौधरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरीश कुमार यांनी सांगितलं की, मुलौडी गावात एका भांडण आणि मारहाणीची तक्रार आम्हाला मिळाली होती. राम सिंह यांचा मुलगा रामलाल याने या प्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली असून, आम्ही संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून घेतला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच शोधून अटक केली जाईल.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
'तुम्ही मला मत का नाही दिलं?', या रागातून सरपंचाने घेतला सेवानिवृत्त कॅप्टनचा जीव, मुलगा म्हणाला...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement