IND vs PAK : टीम इंडियाने माज उतरवला, पण पाकिस्तानी कोचचं 'नापाक' कृत्य; पायदळी तुडवला ICC चा सर्वात मोठा नियम!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs PAK U19 match : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीसी सरफराज अहमद याला (Sarfaraz Ahmed Break ICC Rule) नेमकी काय शिक्षा सुनावते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Sarfaraz Ahmed Break ICC Rule : अंडर 19 वर्ल्ड कपच्या सुपर सिक्स फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात थरारक मॅच पाहायला मिळाली. भारताने दिलेल्या 253 रन्सच्या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानची टीम सपशेल अपयशी ठरली. पाकिस्तानचा पूर्ण संघ 46.2 ओव्हरमध्ये केवळ 194 रन्सवर ऑल आऊट झाला. भारताने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची दाणादाण उडाली आणि ही मॅच भारताने खिशात घातली. पण या मॅचमध्ये पाकिस्तानच्या कोचने थेट आयसीसीचा नियम पायदळी तुटवला आहे.
आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन
अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मॅच सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला. पाकिस्तानचा मेंटॉर आणि माजी कॅप्टन सरफराज अहमद याने डगआउटमध्ये बसून थेट आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. या मॅचदरम्यान सरफराज अहमद चक्क मोबाईल फोन वापरताना कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेचे फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
advertisement
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जमा केले जातात
ICC च्या कडक नियमांनुसार, लाईव्ह मॅच सुरू असताना कोणताही खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ मोबाईल फोनचा वापर करू शकत नाही. खेळाडू स्टेडियममध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांचे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जमा केले जातात. सरफराज अहमद यांची ही कृती 'ICC कोड ऑफ कंडक्ट'चे स्पष्ट उल्लंघन मानली जात आहे. या गंभीर चुकीमुळे आता त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
How was Sarfaraz Ahmed using a phone during a U19 match? That’s a fair question, especially given the ICC’s strict ban on communication devices in the PMOA.
These rules exist for a reason, to prevent any form of outside influence or match fixing. Anyone watching this? pic.twitter.com/FsFDPNc57q
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) February 1, 2026
advertisement
मैदानावर खेळ चुरशीचा होत असतानाच डगआउटमधील या प्रकारामुळे पाकिस्तान क्रिकेट टीम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीसी सरफराज अहमद याला नेमकी काय शिक्षा सुनावते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या प्रकारामुळे मॅचच्या निकालासोबतच पाकिस्तानच्या शिस्तीवरही आता क्रीडा वर्तुळातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
टीम इंडियाची कामगिरी
advertisement
दरम्यान, भारतीय टीमसाठी वेदांत त्रिवेदीने 98 बॉलमध्ये 58 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला कनिष्क चौहानने 29 बॉलमध्ये 35 रन्स करून चांगली साथ दिली. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने 22 बॉलमध्ये 30 रन्सची वेगवान खेळी केली, तर आर अंबरिशने शेवटच्या ओव्हरमध्ये 15 बॉलमध्ये 21 रन्सचे योगदान दिले. या फलंदाजांच्या जोरावर टीम इंडियाने 252 रन्सचा पल्ला गाठला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 7:51 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : टीम इंडियाने माज उतरवला, पण पाकिस्तानी कोचचं 'नापाक' कृत्य; पायदळी तुडवला ICC चा सर्वात मोठा नियम!








