नागपूरात भररस्त्यात महिलेचा चिरला गळा, जावईच निघाला खूनी, CCTV व्हिडीओ आला समोर

Last Updated:

Crime in Nagpur: नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या करण्यात आली.

News18
News18
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी नागपूर: नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या करण्यात आली. आरोपींनी एकट्या महिलेचा पाठलाग करून भररस्त्यात ही हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर जावयानेच केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. माया मदन पसेरकर असं हत्या झालेल्या ५० वर्षीय महिलेचं नाव आहे. जावई मुस्तफा खान याने हत्या केल्याचं आता समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. आरोपीनं पैशांच्या वादातून ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत माया पसेरकर यांनी दोन विवाह केले होते. त्यांना एक सावत्र मुलगी होती. सावत्र मुलगी गीता हिने मुस्तफा खान नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपूर्वी मयत माया यांनी जावई मुस्तफा याच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते. पण माया पैसे परत देत नव्हत्या. यामुळे मागील अनेक दिवसांपासून सासू आणि जावयामध्ये वाद सुरू होता. याच वादातून जावई मुस्तफा याने सासू माया पसेरकर यांच्या हत्येचा कट रचला.
advertisement
घटनेच्या दिवशी बुधवारी दुपारी जावई मुस्तफा याने माया यांचा पाठलाग सुरू केला. घरापासून काही अंतरावर दूर गेल्यानंतर त्याने रस्त्यात सासूला गाठलं आणि चाकू भोसकून हत्या केली. आरोपीनं माया यांचा गळा देखील चिरला. हा सगळा प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आरोपी पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आला होता. पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
नागपूरात भररस्त्यात महिलेचा चिरला गळा, जावईच निघाला खूनी, CCTV व्हिडीओ आला समोर
Next Article
advertisement
BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे.

  • मेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला

  • काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत

View All
advertisement