70th National Film Award : परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
70th National Film Award परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कार पटकवल्यानं सर्वत्र कौतुकाची थाप मिळत आहे.
मुंबई : 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी वाळवी हा चित्रपट सर्वोत्तम राष्ट्रीय चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कार पटकवल्यानं सर्वत्र कौतुकाची थाप मिळत आहे. या सिनेमात स्वप्निल जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे, सुबोध भावे हे कलाकार प्रमुख भुमिकेत होते.
त्याचप्रमाणे गुलमोहोर हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. तर यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची छाप असल्याचं पाहायला मिळत आहे. वाळवी सिनेमाबरोबरच साहिल वैद्य यांच्या 'मर्मर्स ऑफ द जंगल' या सिनेमाला बेस्ट डॉक्यु्मेंटरी पुरस्कार आणि बेस्ट नॅरेशन असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.
इतकंच नाही तर सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या 'वारसा' या सिनेमालाही राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यातच आला आहे. या सिनेमानं बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार पटकवला आहे. 'मर्मर्स ऑफ द जंगल' या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम निवेदन पुरस्कार, सर्वोत्तम माहितीपट पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 16, 2024 2:08 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
70th National Film Award : परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा









