'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेचा कांड, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

Last Updated:

मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक अभिनेत्री आपल्या कामामुळे चर्चेत आहेत, पण एका अभिनेत्रीचं नाव गुन्हेगारी प्रकरणात आल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

News18
News18
मुंबई: मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक अभिनेत्री आपल्या कामामुळे चर्चेत आहेत, पण एका अभिनेत्रीचं नाव गुन्हेगारी प्रकरणात आल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमात शोभेल असा थरार मुंबईच्या गोरेगाव परिसरात पाहायला मिळाला. १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका बिल्डरला धमकावणाऱ्या दोन महिलांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, यात अटक करण्यात आलेली मुख्य आरोपी दुसरी तिसरी कोणी नसून मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर आहे.

पोलिसांनी रंगेहात पकडलं

गोरेगावमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अरविंद गोयल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. गोयल यांच्या मुलावर आंबोली पोलीस ठाण्यात एक फौजदारी गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा मिटवण्यासाठी आणि पोलिसांकडून मदत मिळवून देण्यासाठी हेमलता आणि तिच्या साथीदाराने गोयल यांच्याकडे १० कोटी रुपयांची मागणी केली होती.
बिल्डरने घाबरून न जाता थेट गुन्हे शाखेशी संपर्क साधला. पोलिसांनी सापळा रचला आणि दीड कोटी रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना हेमलता पाटकर आणि तिची मैत्रीण अमरिना झवेरी यांना रंगेहाथ पकडले.
advertisement

कोण आहे हेमलता पाटकर?

अटक करण्यात आलेल्या महिलांची ओळख आता उघड झाली आहे. ३९ वर्षीय हेमलता आदित्य पाटकर उर्फ ​​हेमलता बाणे ही कांदिवलीची रहिवासी असून मराठी सिनेसृष्टीतील एक ओळखीचा चेहरा आहे. विशेष म्हणजे, ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत कांचन देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या अर्चना पाटकर यांची ती सून आहे. तर, ३३ वर्षीय अमरिना इक्बाल झवेरी उर्फ ​​एलिस ही सांताक्रूझची रहिवासी असून हेमलताची जवळची मैत्रीण आणि या कटातील भागीदार आहे. पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, हेमलता पाटकर ही सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. यापूर्वीही तिच्यावर मेघवाडी पोलीस ठाण्यात मारहाण (कलम ३२३), अनाधिकृत प्रवेश (कलम ४५२) आणि दमदाटी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
advertisement
या दोन्ही महिलांना शनिवारी एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की, या दोघीही तपासात अजिबात सहकार्य करत नाहीत. पोलिसांनी अद्याप हेमलताच्या हस्ताक्षराचे नमुने आणि अमरिनाच्या आवाजाचे नमुने गोळा करायचे आहेत. या दोघींनी मिळून इतरही कोणाला लुटले आहे का? किंवा त्यांच्या मागे आणखी कोणी आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. दोन्ही आरोपींना आता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement

बिल्डरची सतर्कता आणि पोलिसांचे यश

आपल्या मुलावरील संकट टाळण्यासाठी १० कोटी देण्याऐवजी अरविंद गोयल यांनी कायद्याचा मार्ग निवडला, ज्यामुळे या हाय-प्रोफाईल खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश झाला. ग्लॅमरच्या दुनियेत काम करणाऱ्या कलाकारांचे नाव अशा गुन्ह्यात आल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेचा कांड, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं
Next Article
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray: जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदेश काय?
जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदे
  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.

  • जागा वाटपात स्थानिक पातळीवर काही जागांवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आग्रही आह

  • शिवसेना ठाकरे गटाच्या सगळ्या शाखा प्रमुखांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे.

View All
advertisement