6 महिन्यांची वॉरंटी आणि महिनाभरातच चप्पल तुटली; आता दुकानाच्या मॅनेजरला होणार अटक

Last Updated:
Court On Chappal Broken : व्यक्तीने शोरूममधून खरेदी केलेली चप्पल लगेच तुटणं शोरूम मॅनेजरला चांगलंच महागात पडलं आहे. त्याला आता अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
1/5
तुम्ही चांगल्या दुकानांमधून चप्पल खरेदी केली की दुकानदार सांगतो की इतक्या महिन्याची वॉरंटी आहे, चप्पल तुटली तर परत माझ्याकडे घेऊन या मी तुम्हाला दुसरी चप्पल देतो. असंच एका दुकानात एका व्यक्तीला मिळालेलं आश्वासन. पण ते न पाळणं मॅनेजरला चांगलंच महागात पडलं आहे.

advertisement
2/5
उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधील हे प्रकरण. बट्सगंजमध्ये राहणारा आरिफ ज्याने सांगितलं की ट्रान्सपोर्ट चौकात त्याने 17 मे 2022 मध्ये एका शोरूममधून 1700 रुपयांची चप्पल खरेदी केली होती. मॅनेजरने चपलेवर 6 महिन्यांच्या वॉरंटीचं आश्वासन दिलं होतं. पण महिनाभरातच ती खराब झाली आणि तुटली.

3/5
आरिफ म्हणाला, मी ती चप्पल पुन्हा दुकानात नेली. तेव्हा मॅनेजरने ती चप्पल ठेवून घेतली. पण त्या बदल्यात ना दुसरी चप्पल दिली, ना पैसे परत केले. उलट तो आपल्याला टाळत राहिला. पण आरिफ शांत बसला नाही. चपलेसाठी दुकानाच्या वारंवार खेटा घातल्यानंतर मॅनेजर काही ऐकत नाही हे लक्षात येताच त्याने कायदेशीर मार्ग निवडला. 17 ऑक्टोबर 2022 रोजी त्याने जिल्हा ग्राहक आयोगाचा दरवाजा ठोठावला.

4/5
सुनावणीनंतर आयोगाने शोरूम मॅनेजर मोहम्मद उस्मानला नोटीस पाठवली. पण तो हजर झाला नाही आणि त्याने आपली बाजूही मांडली नाही. त्यामुळे 8 जानेवारी 2024 रोजी आयोगाने यावर आपला निकाल दिला. आयोगानं सांगितलं की मॅनेजरने ग्राहकाला चपलेची किंमत 1700 रुपये, मानसिक छळ केल्याची भरपाई 2500 रुपेय आणि केस लढण्यासाठी लागलेला खर्च 5000 रुपये, असा एकूण 9500 रुपयांचा दंड भरावा.

5/5
या आदेशाचंही मॅनेजरने पालन केलं नाही. त्यामुळे कोर्टाने उपभोक्ता संरक्षण अधिनियम, 2019 कलम 72 अंतर्गत आपल्या शक्ती वापरल्या. आयोगाने सीतापूरच्या पोलीस अधीक्षकांना मॅनेजरला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याला अटक करून 2 जानेवारी 2026 पर्यंत आयोगासमोर हजर करायला सांगितलं आहे, असं वृत लॉ ट्रेंड वेबसाईटवर देण्यात आलं आहे.

ZP Election Maharashtra: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी अपडेट...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी
  • नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

  • दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचे वृत्त समोर

  • महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार अ

View All
advertisement