Uddhav Thackeray Raj Thackeray: जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदेश काय?

Last Updated:

Shvi Sena UBT : जागा वाटपाचा पेच कायम असताना दुसरीकडे मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या सगळ्या शाखा प्रमुखांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे.

जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदेश काय?
जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदेश काय?
मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती जाहीर झाली असली तरी जागा वाटपाचा पेच कायम असल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. मात्र, जागा वाटपात स्थानिक पातळीवर काही जागांवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आग्रही आहेत. जागा वाटपाचा पेच कायम असताना दुसरीकडे मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या सगळ्या शाखा प्रमुखांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे. या बैठकीत विभाग प्रमुखांसह आमदार-खासदारांनाही बोलावण्यात आले आहे. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मातोश्रीवरून बैठकीचे निरोप पाठवण्यात आले. मुंबईतील सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच सर्व लोकप्रतिनिधींना सेना भवनात तातडीने बोलावण्यात आले आहे. या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, निवडणूक रणनीतीच्या दृष्टीने ती अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आजच पक्ष, युती आणि आघाडीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत जागा वाटप, उमेदवारांची नावे तसेच युती-आघाडीच्या धोरणावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
विशेषतः मुंबईतील जागांबाबत कोण कुठून लढणार, यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे भवितव्य आजच्या बैठकीत ठरणार आहे. अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी गोंधळ टाळण्यासाठी पक्ष नेतृत्वाने ही बैठक बोलावल्याचेही बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात स्थानिक पातळीवरील अधिक समन्वयासाठी देखील काही सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.
advertisement
या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचे नाव स्पष्टपणे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेना भवनातील या बैठकीकडे राजकीय विश्लेषकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर संबंधित बातमी:

advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Raj Thackeray: जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदेश काय?
Next Article
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray: जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदेश काय?
जागावाटपाचा पेच! शाखा–विभागप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीची बैठक, मातोश्रीचे आदे
  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.

  • जागा वाटपात स्थानिक पातळीवर काही जागांवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आग्रही आह

  • शिवसेना ठाकरे गटाच्या सगळ्या शाखा प्रमुखांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे.

View All
advertisement