advertisement

मुंबई-पुणे प्रवास; रक्तानं माखलेली कार अन् ते CCTV फुटेज, माळशेज घाटात प्रवाशाकडूनच Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या, तपासात धक्कादायक उलगडा

Last Updated:

गुरुवारी (५ मार्च) रात्री नासिर अहमद यांनी टिटवाळा येथून जुन्नरसाठी एक राईड स्वीकारली. प्रवासी होता आदर्श चंद्रकांत भेलेराव (वय २१), जो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पुणे येथे जात होता

Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या (प्रतिकात्मक फोटो)
Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई : ऐरोली येथील ३३ वर्षीय उबेर ड्रायव्हर नासिर सलाम अहमद यांची माळशेज घाटातील गणेशखिंड परिसरात निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेने टिटवाळा येथील २१ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. आरोपीने हा खून स्वसंरक्षणासाठी केल्याचा दावा केला असला तरी, रक्ताने माखलेली गाडी आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमका घटनाक्रम काय?
गुरुवारी (५ मार्च) रात्री नासिर अहमद यांनी टिटवाळा येथून जुन्नरसाठी एक राईड स्वीकारली. प्रवासी होता आदर्श चंद्रकांत भेलेराव (वय २१), जो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पुणे येथे जात होता. माळशेज घाटातील निर्मनुष्य भागात ही गाडी पोहोचली असता नासिर यांची हत्या करण्यात आली. शनिवारी पोलिसांना नासिर यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह घाटात आढळून आला.
advertisement
गाडीतील रक्ताचे डाग अन् पोलिसांचा तपास
शुक्रवारी सकाळी टिटवाळा-मुरबाड हायवेवर रक्ताने माखलेली एक अर्टिगा कार बेवारस अवस्थेत आढळली. गाडीच्या आत आणि बाहेर रक्ताचे सडे असल्याने सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. टिटवाळा पोलिसांनी तांत्रिक तपास, उबेर ॲपचे रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. एका पेट्रोल पंपावरील फुटेजमध्ये आरोपी रक्ताने माखलेली गाडी घेऊन डिझेल भरताना दिसला, ज्यावरून त्याचा माग लागला.
advertisement
आरोपीचा 'स्वसंरक्षणा'चा दावा
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी आदर्शने गुन्ह्याची कबुली दिली. "ड्रायव्हरने मला चाकू दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी तोच चाकू हिसकावून त्याच्यावर वार केले," असा दावा त्याने केला आहे. नासिर यांची हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह घाटात फेकून दिला आणि रक्ताने माखलेली गाडी टिटवाळ्यात सोडून तो घरी निघून गेला.
पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीचा दावा खरा आहे की हा पूर्वनियोजित कट होता, हे शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक रिपोर्टनंतर स्पष्ट होईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई-पुणे प्रवास; रक्तानं माखलेली कार अन् ते CCTV फुटेज, माळशेज घाटात प्रवाशाकडूनच Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या, तपासात धक्कादायक उलगडा
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement