Abhishek Bachchan: अभिषेकचा स्पेशल मोमेंट, आई, बहिण सगळेच उपस्थित पण पत्नी ऐश्वर्याच MISSING; पाहा VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Abhishek Bachchan: 70 व्या ह्युंदाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2025 मध्ये बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनला बेस्ट एक्टर फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.
मुंबई : 70 व्या ह्युंदाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2025 मध्ये बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनला बेस्ट एक्टर फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. 'आई वांट टू टॉक' सिनेमासाठी त्याला हा अवॉर्ड मिळाला. यावेळी अवॉर्ड फंक्शनमध्ये आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने अभिषेकने सर्वांची मने जिंकली. मात्र त्याच्या एका कृतीने सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं.
संपूर्ण सोहळ्यातील सर्वात भावनिक क्षण ठरला तो म्हणजे, जेव्हा अभिषेकने स्टेजवरून खाली उतरून थेट त्याची आई जया बच्चनकडे आला. जया यांना मिठी मारली आणि थोडा डान्स करायला लावला. आई-लेकाचं बॉन्डिंग पाहून सर्वांनी अभिषेकचं खूप कौतुक केलं. त्याला बेस्ट एक्टर सोबत बेस्ट सनही म्हटलं.
advertisement
या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेही खास होता. याच निमित्ताने अभिषेक बच्चनने स्टेजवर आपल्या वडिलांच्या गाण्यांवर एक खास परफॉर्मन्स सादर केला. तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या जया बच्चन, मुलगी श्वेता नंदा आणि नात नव्या नवेली नंदा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. जया बच्चन यांचा हास्य आणि मुलाचा परफॉर्मन्स बघून अभिमानाने फुलून आलेला चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला.
advertisement
advertisement
दरम्यान, अभिषेक बच्चन आणि जया यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सर्वांची मने जिंकत असताना मात्र काहींनी ऐश्वर्याची आठवण झाली. सर्वांनी ऐश्वर्या कुठे आहे? ती का तुझ्या स्पेशल अवॉर्डवेळी नाही? असे प्रश्न विचारले? त्यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 9:30 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Abhishek Bachchan: अभिषेकचा स्पेशल मोमेंट, आई, बहिण सगळेच उपस्थित पण पत्नी ऐश्वर्याच MISSING; पाहा VIDEO