दोन्ही पायांना पोलिओ, तरी बनला दिग्दर्शक, 'कुर्ला टू वेंगुर्ला'च्या डारेक्टरसाठी वीणा जामकरची हृदयस्पर्शी पोस्ट

Last Updated:

Veena Jamkar Post for Kurla To vengurla Director : 'कुर्ला टू वेंगुर्ला'च्या दिग्दर्शकाची गोष्ट खूपच न्यारी आणि प्रेरणादायी आहे. अभिनेत्री वीणा जामकर हिनं दिग्दर्शकासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

News18
News18
मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सलग दुसऱ्या आठवड्यात कोकणातील दोन मराठी सिनेमे रिलीज झाले. एक 'दशावतार' आणि दुसरा 'कुर्ला टू वेंगुर्ला'. दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांनी मनं जिंकली आहेत. दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शकांचं विशेष कौतुक होतं आहे. सुबोध खानोलकरने पहिल्याच सिनेमात त्याच्या दिग्दर्शनाची ताकद दाखवून दिली. तर दुसरीकडे 'कुर्ला टू वेंगुर्ला'चे दिग्दर्शक विजय कलमकर यांची गोष्ट खूपच न्यारी आणि प्रेरणादायी आहे. 'कुर्ला टू वेंगुर्ला'ची नायिका अभिनेत्री वीणा जामकर हिनं दिग्दर्शकासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
वीणा जामकरने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "तुझी मेहनत, अभ्यास, भूमिका, लिडरशीप ह्या पलिकडे आहेत तुझ्यातल्या संवेदना... ज्या लाभतात अर्थातच दुःख -संकटांचा सामना करूनच. आणि ह्या संवेदना जोपासायच्या कि प्रवाह - पतीत होऊन सोडून द्यायच्या ह्याची पण निवडच करावी लागते! तू ती केलीस."
advertisement
"तू 'सिनेमा दिग्दर्शक ' म्हणून खास आहेस. दोन्ही पायांना पोलिओ असलेली व्यक्ती सिनेमा दिग्दर्शक कशी बरं होऊ शकते असं मलाही वाटलंच होतं तुझ्याकडे बघून. पण मी वेळोवेळी अनुभवलं ते तुझ्यात 'नसलेलं ' मानसिक अपंगत्व, जे आमच्यापैकी बहुतेक जणांकडे थोडं फार आहेच. कल्पना करूनही समजू शकत नाही इतक्या अवहेलनेला सामोरं जाऊनही तुझ्या चेहऱ्यावर हसू उमलतं... अन्यायग्रस्त माणसाचं ' रडणं ' आणि त्या 'रडण्याचंच' भांडवल करणं हे तुझ्याकडून अपेक्षित असलेले ' गुण ' तुझ्या आसपासही फिरकत नाहीत.. आणि तिथेच तू खूप मोठा होतोस..!"
advertisement
"कुर्ला टू वेंगुर्ला"चं बॉक्स ऑफिस वर कलेक्शन किती ह्यावर तुझं यश ठरत नाही.. तू तेव्हाच सगळं जिंकलंस जेव्हा पहिल्यांदा हातातली काठी बाजूला सारून, तू दिग्दर्शकाच्या खुर्चीवर विराजमान झालास... काय वाटलं असेल तेव्हा तुला...? लाडक्या, Thank You Very Much...तू तुझ्याच अस्तित्वाला अर्थ दिलास त्यासाठी! नाहीतर माझ्यासारख्या अनेकांनी कुणाकडे पाहिलं असतं? कुठून बळ मिळालं असतं? तू Super Hit है बॉस."
advertisement
"अभिनेता कितीही उत्तम असो त्याला पाठबळ नसेल तर तो सगळं टॅलेंट असूनही अपंगच रहातो. आज आमचं पाठबळ ठरला आहे श्री. अमरजीत आमलेंचा " स्पंदन " परिवार. स्पंदन फिल्म मूव्हमेंट. कुणाच्या फिल्मसाठी एखादा गडगंज श्रीमंत हात पुढे करतो, कुणाच्या पाठीमागे पिढीजात सिनेमा धंद्यातला अनुभव कमी येतो. आमच्या पाठीशी आज 'स्पंदन परिवार' उभा राहिला आहे."
advertisement
वाचा वीणा जामकरची संपूर्ण पोस्ट
'कुर्ला टू वेंगुर्ला' या सिनेमानं आतापर्यंत 26 लाखांची कमाई केली आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत एका लग्नाची रंजक गोष्ट 'कुर्ला टू वेंगुर्ला' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत, वीणा जामकर हे कलाकार सिनेमात महत्त्वाच्या भुमिकेत आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
दोन्ही पायांना पोलिओ, तरी बनला दिग्दर्शक, 'कुर्ला टू वेंगुर्ला'च्या डारेक्टरसाठी वीणा जामकरची हृदयस्पर्शी पोस्ट
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement