Marathi Movie : बॉक्स ऑफिसला कोकणची भुरळ! 'दशावतार'नंतर 'कुर्ला टू वेंगुर्ला'ची हवा, कमाईचा आकडा आला समोर

Last Updated:
Marathi Movie From Kokan : थिएटरमध्ये सलग दोन आठवड्यात कोकणातील दोन मराठी सिनेमे रिलीज झालेत. दोन्ही सिनेमांना चांगलं यश मिळतंय. दोघांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिलं का!
1/8
बॉक्स ऑफिसला कोकणाची भुरळ पडल्याचं पाहायला मिळतंय. 'दशावतार'नंतर 'कुर्ला टू वेंगुर्ला' हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे.

advertisement
2/8
12 सप्टेंबरला 'दशावतार', 'बिन लग्नाची गोष्ट' आणि 'आरपार' हे तीन सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले. यातील 'दशावतार' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बाजी मारली.

3/8
'दशावतार' सिनेमानं पहिल्या 9 दिवसांतच 10 कोटींची कमाई केली. सिनेमानं दुसऱ्या आठवड्यात 10 कोटींचा टप्पा पार करत तिसऱ्या आठवड्यातील सिनेमाची कमाई 15 कोटींहून अधिक झाली आहे.

4/8
तर 19 सप्टेंबरच्या शुक्रवारी एक नाही तर चार मराठी सिनेमे रिलीज झाले. ज्यात 'आतली बातमी फुटली', 'अरण्य', 'कुर्ला टू वेंगुर्ला' आणि 'साबर बोंडं' या सिनेमांचा समावेश आहे.  

5/8
या चार सिनेमांपैकी 'कुर्ला टू वेंगुर्ला' या सिनेमानं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये बाजी मारल्याचं दिसतंय.sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'कुर्ला टू वेंगुर्ला' या सिनेमा भारतात 26 लाखांची कमाई केली आहे. या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहेत.
या चार सिनेमांपैकी 'कुर्ला टू वेंगुर्ला' या सिनेमानं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये बाजी मारल्याचं दिसतंय. sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'कुर्ला टू वेंगुर्ला' या सिनेमा भारतात 26 लाखांची कमाई केली आहे. या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहेत.
advertisement
6/8
12 सप्टेंबरला रिलीज झालेल्या 'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमानं आतापर्यंत 1कोटी 2 लाखांची कमाई केली आहे. 'आरपार'ची एकूण कमाई 1.32 कोटी आहे.

7/8
तर 19 सप्टेंबरला रिलीज झालेल्या 'आतली बातमी फुटली' या सिनेमाची एकूण कमाई 7लाख इतकी झाली आहे. 'अरण्य' सिनेमानं 5 लाख कमावले. तर 'साबर बोडं' सिनेमानं 12 लाखांची कमाई करण्यात यश मिळवलं आहे.

8/8
'दशावतार' आणि 'कुर्ला टू वेंगुर्ला' हे दोन्ही सिनेमे कोकणातील पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेत. दोन्ही सिनेमांत मालवणी भाषेचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही सिनेमांत कोकणाची एक वेगळी बाजू पाहायला मिळतेय. दोन्ही सिनेमांना पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement