Rekha: आधी बघतच राहिली, मग केलं KISS; 'इक्कीस'च्या प्रीमिअरला रेखाने केलं असं काही... VIDEO VIRAL

Last Updated:

Ikkis Screening: रेखा यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि न्यूकमर अगस्त्य नंदा यांच्या फिल्मच्या प्रीमिअरच्या दिवशी जे काही केलं, त्यामुळे इंटरनेटवर सध्या तुफान चर्चा होतेय.

News18
News18
मुंबई: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन ब्युटी रेखा जिथे जातात, तिथे कॅमेऱ्यांचे फ्लॅश आणि लोकांच्या नजरा त्यांच्यावरच खिळतात. पण कधीकधी त्यांनी केलेल्या गोष्टी त्यांच्याच अंगाशी येतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेने धुमाकूळ घातला आहे. निमित्त होतं 'इक्कीस' या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग. रेखा यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि न्यूकमर अगस्त्य नंदा यांच्या फिल्मच्या प्रीमिअरच्या दिवशी जे काही केलं, त्यामुळे इंटरनेटवर सध्या तुफान चर्चा होतेय. सोशल मीडियावर दोन गट पडले असून कोणी त्यांना लेजेंड म्हणतंय, तर कोणी अटेंशन सीकर.
'इक्कीस' हा चित्रपट अनेक अर्थांनी खास आहे. एक तर हा दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट आहे आणि दुसरीकडे यातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला रेखा यांनी आपल्या नेहमीच्या शाही अंदाजात हजेरी लावली.

अगस्त्य नंदाला दिला फ्लाइंग किस

रेड कार्पेटवर फोटोसाठी पोझ देत असताना रेखाची नजर चित्रपटाच्या पोस्टरवर पडली. तिथे धर्मेंद्र यांचा फोटो पाहून रेखा क्षणभर भावूक झाल्या. त्यांनी त्यांच्या प्रतिमेसमोर हात जोडून आदर व्यक्त केला. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण खरी चर्चा सुरू झाली ती पुढच्या क्षणापासून. रेखा यांनी जवळच असलेल्या अगस्त्य नंदाच्या पोस्टरकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी आधी अगस्त्यच्या फोटोवर मायेने हात फिरवला, त्याला जणू आशीर्वाद दिला आणि त्यानंतर चक्क पोस्टरवर फ्लाईंग किस केला.
advertisement
advertisement
रेखा यांचा हा व्हिडिओ क्षणात वणव्यासारखा पसरला आणि कमेंट्सचा पाऊस पडू लागला. अनेक चाहत्यांना रेखाचा हा अंदाज आवडला असला, तरी काहींनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.

सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला व्हिडीओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'रेडिट'वर या व्हिडिओवरून बराच कल्ला पाहायला मिळतोय. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिलं, "एकेकाळी मला ही स्त्री खूप आवडायची, पण आता ती फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करते असं वाटतंय. हे सगळं खूप बनावट आणि ओढून ताणून केल्यासारखं दिसतं." तर दुसऱ्या एकाने म्हटलं, "इतकं विचित्र वागून तिला नक्की काय साध्य करायचं आहे? हे मुळीच कौतुकास्पद नाही, उलट थोडं विचित्र वाटतंय."
advertisement

अमिताभ बच्चन यांच्याशी अगस्त्यचं नातं

अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांचा नातू असल्यामुळे रेखा यांनी त्याच्यावर उधळलेल्या प्रेमाचा संबंध जुन्या कथित अपुऱ्या प्रेमकहाणीशी जोडला जात आहे. "अमिताभ यांच्या नातवाबद्दल इतकं उघडपणे प्रेम व्यक्त करून रेखा पुन्हा एकदा चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे का?" असा सवाल नेटकरी विचारत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rekha: आधी बघतच राहिली, मग केलं KISS; 'इक्कीस'च्या प्रीमिअरला रेखाने केलं असं काही... VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Shiv Sena UBT BMC Election: वरळीत बंडाची चाहूल? नाराज आणि उमेदवार दोघांनाही ‘मातोश्री’वर बोलावणं, रात्रीच्या बैठकीत काय झालं?
वरळीत बंडाची चाहूल? नाराज आणि उमेदवार दोघांनाही ‘मातोश्री’वर बोलावणं, रात्रीच्या
  • मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गटासाठी अतिशय महत्त्वाची समजली जात आहे.

  • दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना ठाकरे गटातील इच्छुकांमध्ये नाराजीचे वाताव

  • या वादात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट हस्तक्षेप केला असल्याची माहिती

View All
advertisement