The Kerala Story 2: "हे फक्त पैसे कमवायचे धंदे...", दिग्दर्शक अनुराग कश्यप 'द केरला स्टोरी 2'च्या दिग्दर्शकांवर भडकले
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'द केरला स्टोरी 2' चित्रपटावर स्तरातून टीका केली जात आहे. आता अशातच प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई: कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित, 'द केरला स्टोरी 2' चित्रपट येत्या 27 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून चित्रपटावर टीका केली जात आहे. 'द केरला स्टोरी 2' चित्रपटावर आता प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. टॉलिवूड इंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर अवॉर्डसाठी जात असताना अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
'द केरला स्टोरी 2'च्या ट्रेलरमध्ये एक मुस्लिम परिवार एका मुलीला बीफ खाऊ घालतानाचा सीन आहे. तो सीन पाहिल्यानंतर दिग्दर्शकांनी या चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म म्हटले आहे. त्या सीनवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. टॉलिवूड इंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर अवॉर्डसाठी जात असताना कोच्ची विमानतळावरील काही पापाराझींनी अनुराग कश्यप यांना 'द केरला स्टोरी 2'चा ट्रेलर पाहिला का?असा सवाल विचारला. पापाराझींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना अनुराग कश्यप यांनी दिलं आहे.
advertisement
"खरंतर, 'द केरला स्टोरी 2' हा चित्रपट खूपच बकवास चित्रपट आहे, हा प्रोपगंडा करणारा चित्रपट आहे. असं कोण बिफ खायला घालतं? तशी कोणी कोणाला खिचडी सुद्धा खायला घालत नाही. खूपच बकवास चित्रपट आहे. याला खरंच बकवास असंच म्हणतात. दिग्दर्शक फक्त पैसे कसे कमवायचे? याचाच विचार करतायत. दिग्दर्शक खूपच लोभी माणूस आहे. हे समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र आहे. त्यांना फक्त पैसेच कमवायचे आहे.", अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी माध्यमांना दिली आहे.
advertisement
फक्त अभिनय क्षेत्रातूनच नाही तर, राजकीय क्षेत्रातूनही चित्रपटाविरोधात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी टीका करत प्रतिक्रिया दिली की, "आम्हाला केरळ राज्यामध्ये धार्मिक सद्भावना आणि सामाजिक सलोखा जपून ठेवायचा आहे आणि तो कायम ठेवायचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणाऱ्या केरळ राज्याला दहशतवादाचे केंद्र म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा संपूर्ण प्रकार आधीच रोखला पाहिजे. खोट्या प्रचारामुळे केरळ राज्याचा पाया ढासळणार नाही, याची सर्वांनीच काळजी घ्यायला हवी."
advertisement
दरम्यान, 'द केरला स्टोरी 2' चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने U/A प्रमाणपत्र दिले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 27 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 8:32 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
The Kerala Story 2: "हे फक्त पैसे कमवायचे धंदे...", दिग्दर्शक अनुराग कश्यप 'द केरला स्टोरी 2'च्या दिग्दर्शकांवर भडकले







