advertisement

Baby Doll Archie : फेक अश्लील व्हिडीओ, फोटो व्हायरल केले, बेबी डॉल आर्चीच्या EX बॉयफ्रेंडचा मोठा कांड समोर

Last Updated:

Baby Doll Archie Archita Phukan : गेल्या काही दिवसांपासून बेबी डॉल आर्ची हिचं नाव खूप ऐकायला मिळत आहे. अडल्ट स्टारसोबत तिचे फोटो व्हायरल झाल्यापासून ती ट्रेंडमध्ये आली.

बेबी डॉल आर्चीच्या EX बॉयफ्रेंडचा मोठा कांड समोर
बेबी डॉल आर्चीच्या EX बॉयफ्रेंडचा मोठा कांड समोर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बेबी डॉल आर्ची हिचं नाव खूप ऐकायला मिळत आहे. अडल्ट स्टारसोबत तिचे फोटो व्हायरल झाल्यापासून ती ट्रेंडमध्ये आली. ज्यामुळे तिनेही अडल्ट इंडस्ट्री जॉईन केल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र आता यामध्ये आणखी नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आसाममधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अर्चिता फुकन, जी ‘बेबीडॉल आर्ची’ या नावाने ओळखली जाते, हिच्याबाबत सोशल मीडियावर खोट्या आणि अश्लील गोष्टी व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ झाला. काही दिवसांपूर्वी अर्चिताचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. यामध्ये असा दावा करण्यात आला की ती परदेशी पोर्न इंडस्ट्रीशी संबंधित आहे. या आरोपांमुळे तिची प्रतिमा पूर्णपणे मलिन झाली होती.
advertisement
पण आता पोलिस तपासात एक मोठा खुलासा झाला आहे. अर्चिताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आणि हा सारा कट तिच्या EX प्रियकर प्रतिमा बोरा याने रचल्याचे उघड झाले. पोलिसांनी प्रतिमाला अटक केली असून, त्याने AI तंत्रज्ञानाचा वापर करून अर्चिताचे खोटे अश्लील फोटो तयार केल्याची कबुली दिली आहे.
advertisement
अर्चिता आणि प्रतिमा यांच्यात काही काळ प्रेमसंबंध होते. मात्र ब्रेकअपनंतर वैयक्तिक द्वेषातून त्याने तिला बदनाम करण्यासाठी फोटो मॉर्फिंग करून सोशल मीडियावर पोस्ट केले. एवढंच नाही, तर त्याने बनावट अकाऊंट्स वापरून अर्चितावर खोटे आरोप करत व्हिडिओ व्हायरल केले. आसाम पोलिसांनीही स्पष्टपणे सांगितले की अर्चिता फुकनचा कोणत्याही प्रकारच्या पोर्नोग्राफिक कंटेंटशी काहीही संबंध नाही. तिला खोट्या पद्धतीने बदनाम करण्यात आलं आहे. हा प्रकार केवळ AI चा दुरुपयोग असून, त्यामागे वैयक्तिक सूडाची भावना होती.
advertisement
दरम्यान, अर्चिताने पोलिसांची मदत घेतल्याने सत्य बाहेर आलं आणि आरोपीला अटक झाली. सोशल मीडियावर तिच्या समर्थनातही आता लोक आवाज उठवत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Baby Doll Archie : फेक अश्लील व्हिडीओ, फोटो व्हायरल केले, बेबी डॉल आर्चीच्या EX बॉयफ्रेंडचा मोठा कांड समोर
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement