'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात, सुनेत्रा पवारांविरोधात लढणार
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Abhijeet Bichukale: बिग बॉस फेम आणि साताऱ्याचे सुपुत्र अभिजीत बिचुकले यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
बारामती : दिवंगत नेते अजित पवारांच्या बारामतीत सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. यासंबंधी सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बोलणीही सुरू केली होती. मात्र, अशातच या राजकारणात एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत आहे. एका धमाकेदार एन्ट्रीमुळे बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न हाणून पाडले जाणार असल्याचं दिसत आहे. कारण एका धडाकेबाज व्यक्तीने स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ही व्यक्ती दुसरी कोणी नसून बिग बॉस फेम आणि साताऱ्याचे सुपुत्र अभिजीत बिचुकले आहेत. बिचुकले यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता आता धुसर झाल्या आहेत.
सुनेत्रा पवारांविरोधात अभिजीत बिचुकले
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून प्रशासकीय पातळीवर अर्जांची छाननी सुरू आहे. अशातच अभिजीत बिचुकले यांच्या अर्जाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. बिचुकले यांचा याआधीचा इतिहास पाहता, ते एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले की ते मागे हटत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक होणारच यात काही शंका नाही.
advertisement
अभिजीत बिचुकले यांनी अशाप्रकारे निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी लोकसभा, विधानसभा इतकंच नाही तर सातारच्या नगरपालिकेचीही निवडणूक लढवली आहे. त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही दंड थोपटले होते. या निवडणुकांमध्ये त्यांना यश आले नसलं, तरीही त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला नाही.
पत्रकार परिषद घेऊन सांगणार पुढचा प्लॅन
advertisement
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बिचुकले यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. "मी उमेदवारी का भरली? माझे मुद्दे काय आहेत? आणि बारामतीसाठी माझा 'प्लॅन' काय आहे?" हे स्पष्ट करण्यासाठी ते पुढील दोन दिवसांत एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते नक्की कोणावर निशाणा साधतात आणि काय 'ट्वीस्ट' निर्माण करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 7:53 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात, सुनेत्रा पवारांविरोधात लढणार








