Jay Dudhane News: जय दुधाणेची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात, अभिनेत्याची पोलिसांकडून सखोल चौकशी

Last Updated:

'बिग बॉस मराठी 3'चा उपविजेता जय दुधाणे याला काही बनावट कागदपत्रे तयार करून काही दुकानांची बेकायदेशीरपणे विकल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अभिनेत्याची आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पाठवणी करण्यात आली आहे.

Jay Dudhane News: जय दुधाणेची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात, अभिनेत्याची पोलिसांकडून सखोल चौकशी
Jay Dudhane News: जय दुधाणेची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात, अभिनेत्याची पोलिसांकडून सखोल चौकशी
'बिग बॉस मराठी 3'चा उपविजेता जय दुधाणे याला त्याच्या लग्नाच्या अकराव्या दिवशीच मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. हनिमूनसाठी तो आणि त्याची पत्नी जात असतानाच मुंबई पोलीसांनी बेड्या ठोकल्या होत्या. जय आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. जयने जीम व्यवसायाच्या नावाखाली काही बनावट कागदपत्रे तयार करून काही दुकानांची बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप आहे. यामुळे अनेक खरेदीदारांचं आर्थिक नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयला ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने त्याची आई आणि बहीण फरार असल्याची माहिती आहे.
तपास यंत्रणांनी जय दुधाणेने व्यवसाय आणि मालमत्तांमध्ये अंदाजे 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जय दुधाणे हा 'पंप' जिमचा सह- मालक आहे आणि 'द बीटरूट कॅफे' चा मालक असल्याचेही वृत्त आहे. तो 'श्री स्वामी समर्थ इन्फ्रा'चा सह- मालक देखील आहे. दुधाणे जून 2025 पासून युएईमध्ये सक्रिय असलेल्या 'इंटिरियर हेवन' या इंटिरियर, एक्सटीरियर आणि रिनोव्हेशन सर्व्हिसेस कंपनीशी संबंधित आहे. FIR दाखल झाल्यानंतर लगेचच, जय दुधाणेने वेदांत प्रकल्पातील एक फ्लॅट त्याची पत्नी हर्षला पाटीलच्या नावावर ट्रान्सफर केला. लग्नाच्या आधीच जयने आपल्या पत्नीच्या नावावर फ्लॅट केला होता. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सध्या सुरू आहे.
advertisement
येत्या काही दिवसांत आणखी खुलासे होऊ शकतात, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. लग्नाला 10 दिवसही पूर्ण झाले नाहीत तोच अभिनेता वादाच्या भोवऱ्यात सापडला. जयच्या अटकेमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठी खळबळ उडाली. गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच, 24 डिसेंबर 2025 रोजी जयने आपली गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्याशी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत असतानाच, नवऱ्याला जेलची हवा खावी लागल्याने त्याच्या पत्नीला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
दरम्यान, जय दुधाणेने आपल्या करियरची सुरुवात 'स्पिट्सविला 13' मधून केली होती, जिथे त्याने विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर 'बिग बॉस मराठी 3' मध्ये तो उपविजेता ठरला. 'गडद अंधार' आणि महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' यांसारख्या मोठ्या चित्रपटांत त्याने काम केलं आहे. मात्र, आता या फसवणुकीच्या प्रकरणामुळे त्याच्या करिअरवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Jay Dudhane News: जय दुधाणेची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात, अभिनेत्याची पोलिसांकडून सखोल चौकशी
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement