advertisement

Suraj Chavan Wedding: सुरज चव्हाणच्या लग्नात जान्हवी किल्लेकरचा बहिणीचा थाट! लाडक्या भावाला दिलं अनोखं गिफ्ट, VIDEO

Last Updated:

Suraj Chavan Wedding: जान्हवीने आपल्या लाडक्या भावासाठी घेतलेल्या गिफ्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

News18
News18
मुंबई: बिग बॉसचे चाहते ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ती गोष्ट झाली आहे. 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सूरज चव्हाण आणि त्याची चुलत मामाची मुलगी संजना यांचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात पार पडला. सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे हा विवाहसोहळा अतिशय ग्रँड ठरला. 'बिग बॉस'मधील सुरजची मानलेली बहीण जान्हवी किल्लेकर हिने या लग्नात अगदी हिरीरीने सहभाग घेतला होता. दरम्यान, जान्हवीने आपल्या लाडक्या भावासाठी घेतलेल्या गिफ्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सुरज चव्हाणचं लग्न अतिशय थाटामाटात पार पडलं. या ग्रँड सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सेलिब्रिटींना पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे सूरजच्या लग्नात थोडा गोंधळ पाहायला मिळाला. हा गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी जान्हवीने थेट मायक्रोफोन हातात घेतला. यावेळी उपस्थितांना विनंती आणि दम देत तिने परिस्थिती नियंत्रणात आणली. सूरजच्या हळदीपासून ते साखरपुड्यापर्यंत आणि वरातीमध्ये मनसोक्त नाचण्यापर्यंत जान्हवीने प्रत्येक विधीत उत्साहाने सहभाग घेतला.
advertisement

जान्हवीने सुरजला दिलं महागडं गिफ्ट

बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून एकमेकांसमोर उभे असतानाही त्यांनी बहीण-भावाचे नाते जोडले होते. लग्नाच्या प्रत्येक क्षणात हे कर्तव्य जान्हवीने निभावल्याचे दिसले. लग्न लागल्यानंतर जान्हवीने सूरजला दिलेल्या महत्त्वाच्या भेटीची झलक दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे तिचे खूप कौतुक होत आहे.
जान्हवीने आपला लाडका भाऊ सूरजला सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली. हे महागडे गिफ्ट पाहून सूरजच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. अंगठी आवडली का, असे विचारताच त्याने आनंदाने होकार दिला. जान्हवीने हा क्षण शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, "माझ्या आयुष्यातील खास माणसासाठी खास गिफ्ट". यानंतर तिने नवदाम्पत्यासोबत फोटोही काढले.
advertisement
advertisement

सुरजच्या लग्नात अंकिता वालावलकरची अनुपस्थिती

सूरज आणि अंकिता प्रभू वालावलकर यांच्यातही बिग बॉसच्या घरातून भावंडांसारखे नाते निर्माण झाले होते. त्यामुळे अंकिता लग्नात उपस्थित नसणे, चाहत्यांना खटकले. मात्र, अंकिताच्या जवळच्या नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे ती उपस्थित राहणार नाही, हे तिने आधीच स्पष्ट केले होते. महत्त्वाचे म्हणजे, तिने सूरजला लग्नाचा संपूर्ण बस्ता खरेदी करण्यासाठी मदत करून आपले कर्तव्य निभावले होते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Suraj Chavan Wedding: सुरज चव्हाणच्या लग्नात जान्हवी किल्लेकरचा बहिणीचा थाट! लाडक्या भावाला दिलं अनोखं गिफ्ट, VIDEO
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement