धक्काबुक्की आणि कपड्यांची फेकाफेकी; आठवड्याच्या सुरुवातीलाच निक्कीने घेतलं घर डोक्यावर
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
'बिग बॉस मराठी 5' सुरु होऊन 15 दिवस उलटले. आजपासून तिसरा आठवडा सुरु होतोय. नवा आठवडा सुरू झाला असून नव्या आठवड्यातही सदस्य फुल ऑन कल्ला करताना दिसून येणार आहेत.
मुंबई : 'बिग बॉस मराठी 5' सुरु होऊन 15 दिवस उलटले. आजपासून तिसरा आठवडा सुरु होतोय. नवा आठवडा सुरू झाला असून नव्या आठवड्यातही सदस्य फुल ऑन कल्ला करताना दिसून येणार आहेत. आजच्या भागात निक्की घर डोक्यावर घेताना दिसणार आहे. आज काय होणार याचा नवा प्रोमो समोर आलाय. या प्रोमोने आजच्या भागाची आणखीनच उत्सुकता वाढवली आहे.
आज पॅडी आणि निक्कीचं जोरदार वाजणार आहे. त्यानंतर निक्की पूर्ण घरंच डोक्यावर घेताना दिसली. तिच्यामुळे घरातल्यांनाही त्रास सहन करावा लागतोय. समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवर भडकलेली दिसून येत आहे. निक्की पॅडीला म्हणतेय,"माझ्या वस्तुंना का हात लावला?". त्यावर पॅडी म्हणतो,"माझी ड्युटी करतोय". यावर उत्तर देत निक्की म्हणते,"मला कामं करायची आहेत...समजलं ना". त्यानंतर राग अनावर झालेली निक्की पॅडीच्या कपड्यांची फेकाफेकी करते.
advertisement
पुढे कोकण हार्टेड गर्ल अंकिता म्हणते,"तुझ्या आवाजाला इथे सगळ्यांनी घाबरुन राहायचं का इथे". त्यावर निक्की 'हो' असं उत्तर देते. त्यानंतर निक्की अंकिताची धक्काबुक्की झालेलं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या आठवड्यात एकही सदस्य घराबाहेर पडला नाही. आता तिसऱ्या आठवड्यात सदस्य कसा कल्ला करणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
advertisement
advertisement
दरम्यान, कालच्या झालेल्या भाऊच्या धक्क्यात रितेशने सदस्यांचा चांगलाच क्लास घेतला. सोबतच भाऊच्या धक्क्यावर काल अक्षय कुमार आणि 'खेल खेल मैं' ची टीम आली होती. त्यांनीही घरातील सदस्यांसोबत कल्ला केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 12, 2024 8:44 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
धक्काबुक्की आणि कपड्यांची फेकाफेकी; आठवड्याच्या सुरुवातीलाच निक्कीने घेतलं घर डोक्यावर







