advertisement

रितेश भाऊच्या धक्क्यानं जान्हवीला आली चक्कर, चुगलीची केली पोलखोल!

Last Updated:

आजच्या धक्क्यात रितेश जान्हवीचं सत्य सगळ्यांसमोर मांडणार आहे. तिचं सत्य समोर येताच तिला चक्कर येते. याचा नवा प्रोमो समोर आलाय.

रितेश भाऊच्या धक्क्यानं जान्हवीला आली चक्कर
रितेश भाऊच्या धक्क्यानं जान्हवीला आली चक्कर
मुंबई : 'बिग बॉस मराठी 5' चा सीझनचा दुसरा आठवडा चांगलाच गाजला. भांडण, प्रेम, वाद सगळंच या आठवड्यात पहायला मिळालं. आठवड्याच्या शेवटी भाऊचा धक्का होतो आणि यामध्ये लय भारी होस्ट रितेश देशमुख सगळ्या स्पर्धकांना धक्का देत असतो. कालच्या भागात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने सदस्यांना चांगलाच धडा शिकवला. तर काहींचं कौतुक केलं. आजच्या धक्क्यात रितेश जान्हवीचं सत्य सगळ्यांसमोर मांडणार आहे. तिचं सत्य समोर येताच तिला चक्कर येते. याचा नवा प्रोमो समोर आलाय.
'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावरील नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश म्हणतोय,"जान्हवी नीट ऐका... मी जे बोलतोय ते खरं बोलतोय... लिव्हिंग एरियामध्ये तुम्ही सोफ्यावर बसला होतात रडत तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं हे सगळं आपण करतोय आणि सगळ्या प्लॅनिंगचं क्रेडिट निक्की घेऊन जाते". रितेश भाऊने जान्हवीचं सत्य समोर आणल्यानंतर तिला भोवळ येते. आता जान्हवीचा खेळ कोणतं वळण घेणार हे पाहावे लागेल.
advertisement
दरम्यान, आज भाऊच्या धक्क्यात खिलाडी अक्षय कुमारही सहभागी होणार आहे. 'खेल खेल में' या चित्रपटाची टीम आजच्या भाऊच्या धक्क्यात कल्ला करताना दिसेल. त्यामुळे आजचा धक्का स्पर्धकांसाठी हटके असणार आहे. अक्षय कुमार रॅपर आर्याच्या फोनमधले मेसेज वाचणार आहे. पण आर्या मात्र अक्षयला जोरात मेसेज वाचू नको म्हणते. यामुळे भाऊच्या धक्क्या हास्यकल्लोळही पहायला मिळणार आहे.
advertisement
advertisement
अक्षय कुमारसह फरदीन खान, वाणी कपूर, अम्मी विर्क, प्रज्ञा जायसवाल आणि आदित्य सील हे कलाकारदेखील ‘भाऊच्या धक्क्या’वर हजेरी लावणार आहेत. अक्षय कुमारच्या येण्याने भाऊच्या धक्का आणखीनच रंगणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
रितेश भाऊच्या धक्क्यानं जान्हवीला आली चक्कर, चुगलीची केली पोलखोल!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement