बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदे झाला बाबा, शिंदेशाही कुटुंबात नव्या कलाकाराचा जन्म!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Utkarsh Shinde : उत्कर्ष शिंदे बाबा झाला आहे! त्याच्या आणि पत्नी स्वप्नजाच्या घरी गोंडस बाळ जन्मलं आहे. उत्कर्षने इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
मुंबई : बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय गायक, डॉक्टर आणि लेखक उत्कर्ष शिंदे सध्या अत्यंत आनंदात आहे. कारण त्याच्या आयुष्यात एक सुंदर वळण आले आहे – तो बाबा झाला आहे! उत्कर्ष शिंदे आणि त्याची पत्नी स्वप्नजा शिंदे यांच्या घरी नुकतंच एक गोंडस बाळ जन्माला आलं असून, त्यांनी या आनंदाची बातमी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
उत्कर्षने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, "शिंदेशाही कुटुंबात आणखी एका कलाकाराचा जन्म. ऑल-राउंडर कमिंग. Blessed with Babyboy." या छोट्याशा पण हृदयस्पर्शी घोषणेनंतर चाहत्यांनी आणि कलाविश्वातील मित्रमैत्रिणींनी उत्कर्षवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
गायक आनंद शिंदे यांचा सुपुत्र उत्कर्ष शिंदे हा एकाचवेळी अनेक क्षेत्रात चमकणारा कलाकार आहे. डॉक्टर म्हणून तो रुग्णांची सेवा करत असतो, तर गायक म्हणून त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर त्याने आपल्या संयमित स्वभाव आणि दिलखुलास हास्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
advertisement
उत्कर्ष आणि त्याच्या पत्नी स्वप्नजाचे वैवाहिक आयुष्य अगदी आदर्शवत आहे. या नव्या बाळाच्या आगमनाने त्यांचं कुटुंब पूर्ण झालं आहे. त्याचे बंधू आदर्श शिंदे यानेदेखील ही बातमी शेअर करत भावाच्या नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मजेदार गोष्ट म्हणजे उत्कर्षच्या बऱ्याच गाण्यांच्या कल्पना बाथरूममध्ये सुचतात, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्याचे सुपरहिट गाण्यांचे बीज तिथेच रोवले जाते, हे त्याचं युनिक सिक्रेट आहे. आता मात्र त्याच्या आयुष्यात नव्या सुरावटीची सुरुवात झाली आहे – 'बाबा' म्हणून!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 24, 2025 2:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदे झाला बाबा, शिंदेशाही कुटुंबात नव्या कलाकाराचा जन्म!