Chhaava Movie: जबरदस्त..! विक्की कौशलचा ‘छावा’ मराठीतही होणार रिलीज, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, कधी पाहता येणार?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Chhaava Movie: अभिनेता विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'छावा' मराठीत रिलीज होणार असल्याचं समोर येतंय.
मुंबई : अभिनेता विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' ची गर्जना बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून थिएटर हाऊसफुल्ल पाहायला मिळतायेत. जगभरात सिनेमा कमाल करत असून कलेक्शनमध्येही बाजी मारताना दिसत आहे. आता 'छावा' सिनेमा मराठीतही रिलीज होणार आहे. याविषयी महत्त्वाची अपडेट समोर आलीय.
'छावा' मराठीत रिलीज होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यांनी X अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांनी 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या भेटीचाही फोटो शेअर केला.
‘छावा’ मराठीतही होणार रिलीज
सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांनी X वर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "आज 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. 'छावा' चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. सोबत अमेय खोपकरही उपस्थित होते."
advertisement
'छावा' मराठीत प्रदर्शित होणार असला तरी अद्याप याबाबत रिलीज डेट किंवा नवी कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मात्र या माहितीने प्रेक्षक खूपच उत्सुक झाले आहेत. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा भव्यदिव्य चित्रपट विक्की कौशलच्या दमदार अभिनयामुळे चर्चेत आहे. हिंदीमध्ये तुफान कमाई केल्यानंतर आता मराठी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट त्यांच्याच भाषेत पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
advertisement
आज "छावा" चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. " छावा " चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणुन विनंती केली. ती त्यांनी मान्य केली.सोबत अमेय खोपकर उपस्थित होते.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde… pic.twitter.com/c5aZSyMAjP
— Uday Samant (@samant_uday) February 18, 2025
advertisement
दरम्यान, संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असल्यामुळे थिएटरमध्ये प्रचंड गर्दी होत आहे, आणि तिकीट मिळवणेही कठीण झाले आहे. पहिल्या तीन दिवसांतच 'छावा'ने तब्बल 116.5 कोटींची घसघशीत कमाई केली आहे. 2025 चा मोठा ओपनर हा सिनेमा ठरला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 19, 2025 2:54 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Chhaava Movie: जबरदस्त..! विक्की कौशलचा ‘छावा’ मराठीतही होणार रिलीज, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, कधी पाहता येणार?