'जर मी तोंड उघडलं ना...', युझवेंद्र चहलला धोका दिला देण्याच्या अफवांवर धनश्री वर्माने पहिल्यांदाच सोडलं मौन

Last Updated:

Dhanashree Verma-Yuzvendra Chahal Divorce : धनश्रीवर युजवेंद्रला धोका दिल्याचा आरोप करण्यात आला होता, ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. आता धनश्रीने या प्रकरणावर पहिल्यांदाच तोंड उघडलं आहे.

News18
News18
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. सोशल मीडियावर धनश्रीवर युजवेंद्रला धोका दिल्याचा आरोप करण्यात आला होता, ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. आता धनश्रीने या प्रकरणावर पहिल्यांदाच तोंड उघडलं आहे आणि एक खूप मोठा खुलासा केला आहे.

“‘त्यांना भीती आहे, म्हणून त्यांनी खोटं पसरवलं!”

नुकतंच धनश्री वर्मा ‘राइज अँड फॉल’ या शोमध्ये अरबाज पटेलशी बोलत होती. यावेळी तिने तिच्या आणि युजवेंद्रच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केलं. ती म्हणाली, “घटस्फोटाबद्दलच्या या सगळ्या ज्या गोष्टी सुरू आहेत, त्या पूर्णपणे खोट्या आणि बनवलेल्या आहेत. मी त्यांना आधीच मागे सोडलं आहे.”
advertisement
advertisement
यावर अरबाज पटेलने तिला विचारलं की, तिच्यावर युजवेंद्रला धोका दिल्याचा आरोप झाला, त्याबद्दल तिला काय वाटतं? यावर धनश्रीने एक खूपच मोठा खुलासा केला. ती म्हणाली, “ते लोक हे सगळं पसरवणारच ना. त्यांना भीती आहे की, मी माझं तोंड उघडलं तर काय होईल. ते म्हणूनच मला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.” धनश्री पुढे म्हणाली, “अरबाज, जर मी एक-एक गोष्ट सांगितली, तर तुम्हालाही धक्का बसेल.” तिच्या या बोलण्याने सगळ्यांनाच शॉक बसला.
advertisement

घटस्फोट झाल्यानंतर रडली होता धनश्री वर्मा

याआधीही ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत धनश्रीने घटस्फोटाच्या दिवशी युजवेंद्रने घातलेल्या ‘बी युवर ओन शुगर डॅडी’ या टी-शर्टबद्दल भाष्य केलं होतं. तिने सांगितलं होतं की, जेव्हा तिने युजवेंद्रला त्या टी-शर्टमध्ये पाहिलं, तेव्हा तिला खूप धक्का बसला. कारण, ती घटस्फोटासाठी मानसिकदृष्ट्या तयार होती, पण युजवेंद्र असं काहीतरी करेल, याची तिला अपेक्षा नव्हती. ती म्हणाली की, जेव्हा घटस्फोटाची घोषणा झाली, तेव्हा ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि खूप रडली.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'जर मी तोंड उघडलं ना...', युझवेंद्र चहलला धोका दिला देण्याच्या अफवांवर धनश्री वर्माने पहिल्यांदाच सोडलं मौन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement