Dharmendra : लेकीच्या घटस्फोटाला हेमा मालिनींचा पाठींबा, धर्मेंद्र मात्र नाराज; म्हणाले 'वेगळं नका होऊ...'
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
भरत आणि ईशाच्या घटस्फोटाचं कारण समोर आलेलं नाही. पण अभिनेत्री हेमा मालिनी यांचा ईशाच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती आहे. मात्र ईशाचे वडील म्हणजे धर्मेंद्र मात्र लेकीच्या या निर्णयावर खुश नसून त्यांनी आता ईशाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलच्या आयुष्याविषयी काही दिवसांपूर्वी मोठी बातमी समोर आली. लग्नाच्या 11 वर्षानंतर ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याला दोन मुलीही आहेत. गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. भरत आणि ईशाच्या घटस्फोटाचं कारण समोर आलेलं नाही. पण अभिनेत्री हेमा मालिनी यांचा ईशाच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याची माहिती आहे. मात्र ईशाचे वडील म्हणजे धर्मेंद्र मात्र लेकीच्या या निर्णयावर खुश नसून त्यांनी आता ईशाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.
ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचा संसार मोडला आहे. दोघांनीही मागच्या महिन्यात याविषयी घोषणा केली. पण आपल्या लेकीचं लग्न मोडल्यामुळं धर्मेंद्र खूप दु:खी झाले आहेत. आपल्या मुलीच्या या निर्णयानं ते अस्वस्थ झाले आहेत. ईशाने घटस्फोटाच्या निर्णयाविषयी पुन्हा एकदा विचार करावा अशी त्यांची इच्छा आहे. नक्की काय म्हणाले धर्मेंद्र जाणून घ्या.
advertisement
Paru Serial : 'महा फालतू, हे दाखवणं बंद करा...' झी मराठीच्या पारू मालिकेवर भडकले प्रेक्षक; काय घडलं नक्की?
'बॉलीवूड लाइफ'च्या वृत्तानुसार, कुटुंबातील एका जवळच्या सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ बॉलिवूड स्टार धर्मेंद्र यांना त्यांच्या मुलीनं घटस्फोट घ्यावा असं वाटत नव्हतं. घटस्फोटाच्या या निर्णयावर त्यांनी ईशाला पुन्हा एकदा विचार कर असं सांगितलं आहे. लेकीचा संसार मोडल्यानं धर्मेंद्र खूपच अस्वस्थ असून त्यांची रात्रीची झोप उडाली आहे. आई-वडिलांच्या घटस्फोटाचा मुलांवर नकारात्मक परिणाम होतो आणि म्हणून धरमजींना वाटतं की जर लग्न वाचवता येत असेल तर त्यांनी तसं करावं." अशी माहिती आहे.
advertisement
तसंच याच सूत्रांनं पुढे सांगितलंय की, ईशा आणि भरत दोघेही धर्मेंद्र यांच्या खूपच जवळचे आहेत. भरत देओल हा देओल कुटुंबियांसाठी मुलासारखा आहे, तर ईशा त्यांची लाडाची लेक आहे. तिने नेहमी आनंदी राहावं अशी त्यांची इच्छा आहे, परंतु तिच्या आयुष्यात जे घडलंय त्यामुळं ते खूपच दुखी आहेत, कोणत्याही पालकांना आपल्या मुलांचा संसार मोडलेला पाहवला जात नाही.
advertisement
ईशा देओलनं 29 जून 2012 रोजी भरतशी लग्न केलं होतं. दोघांचं लग्न इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणानं पार पडलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर या जोडप्यानं राध्या नावाच्या मुलीला जन्म दिला त्यानंतर 2019 मध्ये ईशानं त्यांची दुसरी मुलगी मिराया तख्तानीला जन्म दिला. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत आणि दोघांना दोन मुली आहेत. आता मात्र 12 वर्षानंतर दोघांचा संसार मोडला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2024 12:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dharmendra : लेकीच्या घटस्फोटाला हेमा मालिनींचा पाठींबा, धर्मेंद्र मात्र नाराज; म्हणाले 'वेगळं नका होऊ...'







