Dhurandhar- The Revenge: 'धुरंदर'पेक्षा 'धुरंदर 2'चा रनटाईम कमी, सेंट्रल बोर्डाने चित्रपटाला कोणतं सर्टिफिकेट दिलं? कोणाकोणाला पाहता येणार
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटाला रिलीजसाठी महिनाभर शिल्लक असताना, चित्रपटाचा एकूण वेळ किती? चित्रपटाला सेंट्रल बोर्डाकडून कोणतं सर्टिफिकेट मिळालं? या सर्वांची अपडेट समोर आली आहे.
ब्लॉकबस्टर स्पाय ॲक्शन 'धुरंदर' चित्रपटाची अजूनही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना पाहायला मिळत आहे. चित्रपट ओटीटीवर रिलीज होऊन 20 दिवस झाले असले तरीही प्रेक्षक अजूनही थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी एकच गर्दी करताना दिसत आहे. 1300 कोटींहून अधिकची कमाई केलेल्या 'धुरंदर' चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार आहे. या सिक्वेलची रिलीज डेट सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. चित्रपट रिलीजसाठी एक महिना शिल्लक राहिला असताना, नुकतंच चित्रपटाचा एकूण वेळ किती असणार? चित्रपटाला सेंट्रल बोर्डाकडून कोणतं सर्टिफिकेट मिळालं? या सर्वांची अपडेट आता समोर आली आहे.
'धुरंदर' चित्रपट 3 तास 35 मिनिटांचा होता, पण 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटाचा अवधी कमी असणार आहे. हा चित्रपट तुम्ही तुमच्या 16 वर्षांवरील मुलांसोबत पाहू शकणार आहेत. सेंट्रल बोर्डाने 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटाला 9 फेब्रुवारीला UA 16+ सर्टिफिकेट दिलं होतं. चित्रपटाचा एकूण वेळ 208 मिनिटांचा असून 3 तास 28 मिनिटांचा हा संपूर्ण चित्रपट असेल. म्हणजे, चित्रपटाच्या पहिल्या भागापेक्षा सीक्वेल 7 मिनिटांनी कमी आहे. 'धुरंदर: द रिव्हेंज' साठी चाहते खूपच उत्सुक आहेत. 'धुरंदर' प्रमाणेच 'धुरंदर: द रिव्हेंज'मध्येही स्टारकास्ट सेम असून काही कलाकार चित्रपटातून कॅमिओ करणार आहेत.
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे कथानक हमजा अली मजारी उर्फ जसकीरत सिंग रंगी याच्या "शेर-ए-बलोच" बनण्याचा प्रवास 'धुरंदर: द रिव्हेंज'मध्ये दाखवला जाणार आहे. रहमान डकैतच्या मृत्यूनंतर, कराचीचा अंडरवर्ल्ड आणि आयएसआयच्या फंडिंग नेटवर्कला कमजोर करण्यासाठी त्याने केलेली लढाई कथानकाचे प्रमुख मुद्दे असतील. "बडे साहब" म्हणजे कोण? याचाही उलगडा होणार आहे. यामी गौतम सुद्धा चित्रपटातून कॅमिओ करणार आहे. निर्मात्यांनी अधिकृतपणे तिच्या भूमिकेबद्दल खुलासा केलेला नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने कथानकाभोवतीचा सस्पेन्स त्यांनी कायम ठेवला आहे.
advertisement
दरम्यान, दिग्दर्शक आदित्य धर 'धुरंदर'ची कथा 'धुरंदर: द रिव्हेंज'मध्ये कशा पद्धतीने पुढे नेतो? 'धुरंदर: द रिव्हेंज' हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'धुरंदर: द रिव्हेंज' 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट "टॉक्सिक: अ फेयरीटेल फॉर ग्रोन- अप्स" चित्रपटही रिलीज होणार आहे. हे दोन्हीही चित्रपट क्लॅशेस होण्याची भिती आहे. 'टॉक्सिक'मध्ये नयनतारा, तारा सुतारिया, हुमा कुरेशी, कियारा अडवाणी आणि रुक्मिणी वसंत यांच्या भूमिका आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 9:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar- The Revenge: 'धुरंदर'पेक्षा 'धुरंदर 2'चा रनटाईम कमी, सेंट्रल बोर्डाने चित्रपटाला कोणतं सर्टिफिकेट दिलं? कोणाकोणाला पाहता येणार








