advertisement

Gondhal Movie: ‘गोंधळ’चा कोट्यवधींचा ओटीटी सौदा? मराठी दिग्दर्शकाने एकाच दिवशी घेतल्या ४ लक्झरी गाड्या!

Last Updated:

संतोष डावखर दिग्दर्शित, ‘गोंधळ’ चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. अलीकडेच चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकल्याची माहिती समोर आली असून चित्रपटाच्या दिग्दर्शकाने करोडोंच्या कार्स खरेदी केल्या आहेत.

director santosh davkhar gondhal movie soon released on ott movie director buy 4 luxurious cars see latest news
director santosh davkhar gondhal movie soon released on ott movie director buy 4 luxurious cars see latest news
मुंबई: बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणारा 'गोंधळ' चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा संतोष डावखर यांच्याकडे आहे. समीक्षकांनी, सेलिब्रिटींनी आणि प्रेक्षकांनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर या चित्रपटाने आपलं नाव कोरलंय. शिवजयंतीच्या दिवशी, या चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. या ओटीटी राईट्सच्या पैशातून दिग्दर्शक चांगलेच मालामाल झाल्याची माहिती मिळत आहे.
किती कोटींची डील झाली?
अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरल्यानंतर, बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केल्यानंतर 'गोंधळ' चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. चित्रपट कोणत्या ओटीटीवर आणि कोणत्या तारखेला रिलीज होणार आहे? याची माहिती गुलदस्त्यात आहे. शिवजयंतीच्या दिवशी, 'गोंधळ' चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिज्नी हॉटस्टार, जियो किंवा झी 5 या कोणत्याही ओटीटी ॲपमधून एकाने विकत घेतले आहेत. तब्बल सहा कोटींना ही डील झाली आहे. चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतल्यानंतर दिग्दर्शकांनी थेट अलिशान कार्सचंच दुकान गाठलं. एकाच वेळी दिग्दर्शक संतोष डावखर यांनी एक- दोन नाही तर तब्बल चार कार एकत्र खरेदी केल्या आहेत.
advertisement
दिग्दर्शकांनी कोणत्या कार घेतल्या?
शिवजयंतीच्या दिवशी दिग्दर्शक संतोष डावखर यांनी तब्बल चार लक्झरी गाड्या खरेदी केल्यामुळे सोशल मीडियावर “हा सगळा ओटीटी डीलचा परिणाम तर नाही ना?” अशी चर्चा होत आहे. खरोखंर ओटीटी डिल्स झाल्या आहेत का? याची माहिती समोर आलेली नाही. 'गोंधळ' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, चार गाड्या एकाच वेळी खरेदी करण्यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या ओटीटी राईट्सची डिल कोट्यवधी रुपयांत झालेली असावी. सध्या त्यांच्याकडे मर्सिडिज मेबॅक ही आलिशान गाडी असून त्यांनी आता रेंज रोव्हर, डिफेंडर, बीएमडब्ल्यू, बीव्हायडी सीलायन अशा चार सहा करोडच्या गाड्या घेतल्या आहेत.
advertisement
एकाच वेळी एवढ्या महागड्या गाड्या घेणं म्हणजे, सहाजिकच मोठी डील झाल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याचा नेमका आकडा किती, याबाबतच्या तर्कवितर्कांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. ‘गोंधळ’ चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 99 वर्षांपासून कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) कडून मिळालेला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी ऐतिहासिक क्षण ठरला. 'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. तर, 22 व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा मानाचा पुरस्कार मिळाला.
advertisement
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात 56 वर्षांत प्रथमच मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्व्हर पिकॉक’ अवॉर्ड पटकावत चित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर स्वत:ची एक प्रतिमा तयारी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या झी चित्र गौरव पुरस्कार 2026 मध्ये ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक असे पुरस्कार मिळाले. एकाच चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले हे यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gondhal Movie: ‘गोंधळ’चा कोट्यवधींचा ओटीटी सौदा? मराठी दिग्दर्शकाने एकाच दिवशी घेतल्या ४ लक्झरी गाड्या!
Next Article
advertisement
आजपासून नवे नियम लागू, PM मोदींकडून मोठी घोषणा;  36 नव्हे आता 3 तासांत कारवाई, सरकारच्या नोटिफिकेशनने देशभरात चर्चा
आजपासून नवे नियम लागू, PM मोदींकडून मोठी घोषणा; 36 नव्हे आता 3 तासांत कारवाई
  • आजपासून नवे नियम लागू

  • सरकारचा मोठा निर्णय

  • नियम पाळले नाहीत तर होणार थेट कारवाई

View All
advertisement