काय आहे ईशा देओलचा इन्कम सोर्स? डिवोर्सनंतर कशी करणार 2 मुलींचा सांभाळ
- Published by:Minal Gurav
Last Updated:
लग्नाआधी काही वर्ष डेटींग आणि लग्नाच्या 12 वर्षांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ईशा घटस्फोटानं देओल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या मुलीचा ईशा देओल हिचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या 12 वर्षांनी ईशानं नवऱ्याबरोबरच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे. ईशाला दोन मुली आहेत. ईशानं प्रेमविवाह केला होता. 2012मध्ये तिनं बॉयफ्रेंड भरत तख्तानीबरोबर लग्न केलं. लग्नाआधी काही वर्ष डेटींग आणि लग्नाच्या 12 वर्षांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ईशाच्या घटस्फोटानं देओल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर आता ईशा देओल कुठे राहणार? दोन मुलींची जबाबदारी घेण्यासाठी तिचा इन्कम सोर्स नेमका काय आहे पाहूयात.
ईशा आणि भरत नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो पोस्ट करत होते. दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. मात्र दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. अनेकजण यामागे अनेक तर्क लावताना दिसत आहेत.
advertisement
ईशाकडे नवऱ्याची पॉपर्टी देखील आहे जी तिला घटस्फोटानंतर मिळणार आहे. दोन मुलींसाठी भरत त्याच्या संपत्तीमधील ठरावीक संपत्ती देईल. भरत हा बिझनेसमन असून अरबोंचा मालक आहे. त्यामुळे घटस्फोटानंतर ईशाला पोटगी स्वरूपात काही लाखांची रक्कम मिळेल असं म्हटलं जात आहे.
नवऱ्यापासून वेगळी झालेली ईशा आतापर्यंत लक्झरी आयुष्य जगत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ईशा देओल अनेक जाहिराती करून पैसे कमावते. सोशल मीडियावर अनेक माध्यमातून तिला पैसे मिळत असतात. ईशा आज 40 वर्षांची असून तब्बल 15 कोटीहून अधिक संपत्तीची ती मालकीण आहे.
advertisement
ईशा देओलनं 2002मध्ये आलेल्या 'कोई मेरे दिल से पूछे' या बॉलिवूड सिनेमातून डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं पण ते सिनेमे फ्लॉप झाले. ईशानं केलेल्या सिनेमांमधील काहीच सिनेमे हिट झाले. ईशानं तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये तिचे 'धूम', 'ना तुम जानो ना तुम', 'इंसान', 'नो एंट्री', 'प्यारे मोहन', 'युवा', 'कुछ तो है', 'दस और आंखे' सारखे काही सिनेमे हिट झाले. लग्न झाल्यानंतर मात्र ईशानं बॉलिवूड इंडस्ट्रीला रामराम ठोकला पण आता घटस्फोटानंतर ती कमबॅक करण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2024 2:25 PM IST









