advertisement

मोठी बातमी, ईशा देओलचा घटस्फोट; लग्नाच्या 12 वर्षानंतर मोडला धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या लेकीचा संसार

Last Updated:

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

ईशा देओल आणि भरत तख्तानी
ईशा देओल आणि भरत तख्तानी
मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक दिवसांपासून ईशा आणि तिचा नवरा भरत यांच्यात काही ठीक चालत नसून दोघे वेगळे झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या जोडप्याने कोणतीही औपचारिक माहिती देणं टाळलं होतं. पण आता दोघांनीही अखेर वैवाहिक आयुष्याविषयी खुलासा केला आहे. दोघांच्याही टीमकडून एक निवेदन समोर आलं आहे. काय म्हटलंय दोघांनी जाणून घ्या.
ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्यात वाद झाले असून दोघेही वेगळे झाले असल्याचा दावा एका सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला होता. मात्र, आता दोघांनीही वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती दिली आहे. दिल्ली टाइम्सने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये या जोडप्याने संयुक्त निवेदन जारी केलं आहे. या जोडप्याने त्यांच्या या निवेदनात, "आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी आमची मुलं महत्वाची आहेत. त्यांच्या आनंदाचा आणि हिताचा आम्ही नेहमीच विचार करू. आमच्या प्रायव्हसीचा आदर करा." असं म्हणत दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. ईशाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
ईशा देओलनं 29 जून 2012 रोजी भरतशी लग्न केलं होतं. दोघांचं लग्न इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणानं पार पडलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर या जोडप्यानं राध्या नावाच्या मुलीला जन्म दिला त्यानंतर 2019 मध्ये ईशानं त्यांची दुसरी मुलगी मिराया तख्तानीला जन्म दिला. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत आणि दोघांना दोन मुली आहेत. आता मात्र 12 वर्षानंतर दोघांचा संसार मोडला आहे.
advertisement
ईशाच्या वैयक्तिक आयुष्यात काही ठीक नसल्याची कुणकुण चाहत्यांना आधीच लागली होती. कारण ईशा सोशल मीडियावर सक्रिय असली तरी तिने आता पतीसोबतचे फोटो शेअर करणं थांबवलं होतं. गेल्या काही काळात तिनं फक्त तिच्या मुलींचे फोटो शेअर केले. तसंच ईशाचा नवरा भरत हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसालाही हजर नव्हता. दोघेही आता सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत नव्हते. या गोष्टींमुळेच ईशाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.
advertisement
एवढंच नाही तर याच साईटवर एका युजरने, ईशाचा पती भरत आपल्या कुटुंबापासून वेगळा होऊन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहत असल्याचंही खुलासा केला होता. या नेटकऱ्यानं 'नवीन वर्षाच्या दिवशी बेंगळुरूमध्ये एका पार्टीत त्याने ईशाचा पती भरतला पाहिले होते, जिथे तो त्याच्या एका रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत उपस्थित होता.' असा खुलासा केला होता. भरतची ही मैत्रीण बंगळुरूमध्ये राहते, असंही बोललं जातंय. मात्र, ईशाचा घटस्फोट नक्की का झाला, भरतने ईशाला धोका दिला का याविषयी कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मोठी बातमी, ईशा देओलचा घटस्फोट; लग्नाच्या 12 वर्षानंतर मोडला धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या लेकीचा संसार
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement