कपिलशी भांडला, इंडस्ट्रीतून झालेला गायब... करोडपती अभिनेत्यावर काय वेळ आली! रस्त्यावर कपडे धुताना झाला स्पॉट, VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
चक्क रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हँडपंपवर अभिनेता स्वतःचे कपडे धुताना दिसला असून, त्याच्या व्हिडीओने इंटरनेटवर एकच खळबळ उडवून दिली आहे.
मुंबई : 'डॉक्टर मशहूर गुलाटी' असो वा 'गुत्थी'... आपल्या विनोदाने संपूर्ण जगाला हसवणारा सुनील ग्रोवर हा नेहमीच काहीतरी अतरंगी करण्यासाठी ओळखला जातो. पण यावेळी सुनील एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही जमिनीशी नातं कसं टिकवून ठेवावं, याचा एक उत्तम नमुना सुनीलने दाखवून दिला आहे. चक्क रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हँडपंपवर सुनील स्वतःचे कपडे धुताना दिसला असून, त्याच्या या साधेपणाने इंटरनेटवर एकच खळबळ उडवून दिली आहे.
हँडपंप, बादली अन् सुनीलचा स्वॅग
सुनील ग्रोवरने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो गुलाबी टी-शर्ट आणि काळ्या ट्रॅक पँटमध्ये अगदी सामान्य माणसाप्रमाणे दिसत आहे. व्हिडिओमध्ये सुनील एका हँडपंपवर कपड्यांची बादली घेऊन बसला असून, तो मन लावून कपडे धूत आहे. कपडे धुतल्यानंतर त्याने हँडपंप मारून पाणी काढलं आणि त्याच थंडगार पाण्याने आपला चेहराही धुतला.
advertisement
विशेष म्हणजे, या व्हिडिओला त्याने कोणतंही मोठं कॅप्शन दिलं नाही. पण बॅकग्राऊंडला १९६२ च्या 'बात एक रात की' चित्रपटातील 'ना तुम हमे जानो...' हे हेमंत कुमार यांचं अजरामर गाणं लावून त्याने या व्हिडिओची मजा द्विगुणित केली आहे.
advertisement
advertisement
सुनीलचा हा डाऊन टू अर्थ अवतार पाहून चाहते भारावून गेले आहेत. एका युजरने लिहिलं, "सुनील सर, तुम्ही खऱ्या अर्थाने जमिनीशी जोडलेले कलाकार आहात." तर दुसऱ्या एकाने म्हटलं, "ज्या माणसाला हँडपंप मारण्याची ही संधी मिळाली, त्याला कल्पनाही नसेल की तो कोणासोबत उभा आहे. तुम्ही खरंच महान टॅलेंट आहात." काहींनी त्याला सिम्पल अँड स्ट्रॉन्ग म्हणत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
advertisement
कधी चुलीवरची भाकरी, तर कधी आमीर-सलमानची मिमिक्री
सुनील ग्रोवरने अशा प्रकारे साधेपणाने आयुष्य जगतानाचा व्हिडीओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यातही त्याने एका चुलीवर स्वतःच्या हाताने गोल गरगरीत रोट्या भाजतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. "मित्रांनो, जेवायला या!" असं म्हणत त्याने चाहत्यांना जेवायला येण्याचं आमंत्रणही दिलं होतं.
कामाबद्दल सांगायचं तर, सुनील सध्या नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच त्याने आमीर खान, सलमान खान यांची केलेली मिमिक्री इतकी व्हायरल झाली की खुद्द आमीर खाननेही त्याचं भरभरून कौतुक केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 8:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कपिलशी भांडला, इंडस्ट्रीतून झालेला गायब... करोडपती अभिनेत्यावर काय वेळ आली! रस्त्यावर कपडे धुताना झाला स्पॉट, VIDEO









