5 महिन्यांआधी रिलीज झालेला कोर्टरूम ड्रामा, बॉक्स ऑफिसवर आपटला; पण Netflix वर ट्रेडिंग
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
सध्या नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रेक्षक घरबसल्या चित्रपटांचा अस्वाद घेत आहेत.
मुंबई: ओटीटीवर चित्रपट पाहण्याचा कल प्रेक्षकांचा सर्वाधिक आहे. सुट्टीच्या दिवशी प्रेक्षक घरबसल्या वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर आपले आवडीचे चित्रपट पाहत असतात. सध्या नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रेक्षक घरबसल्या चित्रपटांचा अस्वाद घेत आहेत. सध्या 5 महिने जुना ओटीटीवर रिलीज झालेला चित्रपट कमालीचा ट्रेंडिंगला आलेला आहे. नेमका हा चित्रपट कोणता आहे? ट्रेंडिंगवर येण्यामागील नेमकं कारण काय? जाणून घेऊया...
नेटफ्लिक्स या ओटीटीवर 'धुरंदर' चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानातही चित्रपटाची जोरदार क्रेझ सुरू आहे. जगभरातील चाहत्यांकडून चित्रपटाचे चांगलेच कौतुक केले जात आहे. पण सध्या टॉप 10 च्या ट्रेंडिग मुव्हिज लिस्टमध्ये 5 महिने जुने चित्रपटाचा समावेश झाला आहे. 156 मिनिटांचा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या आवडीचा विषय ठरत आहे. सप्टेंबर 2025 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झालेल्या 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाने दिलासादायक कमाई केली. 166 कोटी ते 169 कोटींच्या आसपास चित्रपटाने कमाई केलेली आहे. 2 तास 36 मिनिटांच्या चित्रपटामध्ये तुम्हाला कोर्ट रूम ड्रामा पाहायला मिळणार आहे.
advertisement
एका गंभीर मुद्द्यावर हा चित्रपट भाष्य करतोय. एक मोठा उद्योगपती गरीब शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे एका शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. शेतकऱ्याची पत्नी त्या व्यापाऱ्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करते, जो एक नाही तर दोन वकील लढतात, असे चित्रपटाचे कथानक आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी प्रमुख भूमिकेत असलेले 'जॉली एलएलबी 3' चित्रपटातील कोर्टरूम ड्रामा सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये ट्रेंडिंगमध्ये आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर नवव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या चित्रपटाला IMDB कडून 6.5 इतकी रेटिंग्स मिळालेली आहे. जर तुम्ही अजूनही चित्रपट पाहिला नसेल, तर नक्कीच हा चित्रपट पाहा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 6:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
5 महिन्यांआधी रिलीज झालेला कोर्टरूम ड्रामा, बॉक्स ऑफिसवर आपटला; पण Netflix वर ट्रेडिंग








