Janhavi Killekar : "मुलींना अक्कल नसते", जान्हवी किल्लेकरचा सोशल मीडियावर संताप, म्हणते, "जर एखादा पुरुष..."
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बिगबॉसच्या घरातही जान्हवी तिची मतं कोणत्याही भीतीशिवाय बिनधास्त मांडायची. अशातच तिच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर तिचा संताप झाला आहे.
बिग बॉस मराठी ५ नंतर जान्हवी किल्लेकर हे नाव महाराष्ट्रात गाजलं. जान्हवीने छोट्या पडद्यापासून तिच्या करिअरला सुरुवात केली. कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारलेली जान्हवी बिग बॉस मराठी ५ मधून तिच्या मूळ रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली. अगदी तिचा प्रवास ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचला. पण नऊ लाख रुपये घेऊन जान्हवी घराच्या बाहेर पडली.
दरम्यान, बिगबॉसनंतर जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसते. ती तिच्या आयुष्यातील अनेक घडामोडी शेअर करत असते. नुकतंच जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ पोस्ट करत तिला आलेला अनुभव सांगितला आहे.
advertisement
जान्हवीने तिच्या अकाऊंटवर दोन व्हिडिओ पोस्ट करत तिचा संताप व्यक्त केला आहे. यावेळी तिने महिलांना पुरुषांपेक्षा कमी लेखणाऱ्या आणि त्यांच्या ड्रायव्हिंग स्किल्सची खिल्ली उडवणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. जान्हवी काय म्हणाली पाहुया.
advertisement
जान्हवीने दोन व्हिडिओ पोस्ट करत तिचं म्हणणं मांडलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती काय म्हणाली पाहा.
advertisement
महिलांच्या गाडी चालवण्याच्या क्षमतेला नेहमीच दुय्यम लेखलं गेलं आहे. जान्हवीलाही त्याचा वैयक्तिक अनुभव आला, त्यानंतर तिने तिचा रोष सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. बिगबॉसच्या घरातही जान्हवी तिची मतं कोणत्याही भीतीशिवाय बिनधास्त मांडायची. खेळताना मुलगा-मुलगी असा भेद केलेला तिला तेव्हाही आवडत नव्हता. अशातच तिच्यासोबत ही घटना घडल्यानंतर तिचा संताप झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 13, 2025 8:55 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Janhavi Killekar : "मुलींना अक्कल नसते", जान्हवी किल्लेकरचा सोशल मीडियावर संताप, म्हणते, "जर एखादा पुरुष..."


