मनोरंजन विश्वाला धक्का! 25 वर्षीय अभिनेत्रीची निर्घृण हत्या, बॉयफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मनोरंजन विश्व हादरलं आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या करण्यात आली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी अभिनेत्रीच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
मनोरंजन विश्वाला हादरवणारी घटना समोर आली आहे. 25 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची चाकूनं हत्या करण्यात आली आहे. अभिनेत्रीला तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या बॉयफ्रेंडनेच मारल्याची माहिती मिळतेय. तिने ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच तिचा घात केला. अभिनेत्रीनं वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त केली आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूपश्चात तिचा 3 वर्षांचा मुलगा, आई-वडील, काकी आणि दोन लहान भाऊ - बहिण आहेत. या घटनेनं मनोरंजन विश्व हादरून गेलं आहे.
21 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. या घटनेनं सगळेच हादरले आहेत. इमानी डिया स्मिथ असं हॉलिवूड अभिनेत्रीचं नाव आहे. 'द लायन किंग', 'ब्रॉडवे' सारख्या प्रसिद्ध कलाकृतींमध्ये तिनं काम केलं आहे. न्यू जर्सीमध्ये तिची चाकू खुपसून हत्या करण्यात आली आहे.
advertisement
न्यू जर्सीच्या काउंटी ऑफिसकडून आलेल्या माहितीत असं सांगण्यात आलं आहे की 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.18 मिनिटांनी आमच्या अधिकाऱ्यांना 911 कॉलवर या घटनेची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ अभिनेत्रीच्या एवेन्यू येथील घरी पोहोचले. अभिनेत्री मृतावस्थेत आढळली. तिच्या शरिरावर असंख्य चाकूचे वार पाहायला मिळाले. अभिनेत्री स्मिथला तात्काळ रॉबर्ट वुड जॉनसन युनिवर्सिटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.डॉक्टरांनी तिला तिथे मृत घोषित केलं.
advertisement
पीपुलच्या माहितीनुसार, स्मिथचा 35 वर्षी बॉयफ्रेंड जॉर्डन डी. जॅक्सन स्मॉलवर अभिनेत्रीच्या हत्येचा संशय असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.. जॉर्डन डी जैक्सन स्मॉल आणि स्मिथ एकमेकांना ओळखत होते. हत्येसोबतच त्याच्यावर आणखी बरेच आरोप करण्यात आले आहेत.
एडिसन पोलिसांनी जॉर्डनला अटक केली आहे. त्याच्यावर फर्स्ट डिग्री मर्डर, सेकेंड डिग्रीमध्ये मुलांची सुरक्षा धोक्यात टाकणे, थर्ड डिग्रीमध्ये अवैधरित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मृत अभिनेत्री इमानी स्मिथच्या मृत्यूपश्चात तिचा 3 वर्षांचा मुलगा, आई-वडील, काकी आणि दोन लहान भाऊ - बहिण आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 3:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मनोरंजन विश्वाला धक्का! 25 वर्षीय अभिनेत्रीची निर्घृण हत्या, बॉयफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात










