4 लग्न, 4 घटस्फोट... आता चर्चेत राहण्यासाठी गायिकेचे अश्लील स्टंट? लाईव्ह शोमधील लिपलॉक व्हायरल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jennifer Lopez : अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्समध्ये जेनिफर लोपेझ बॅकग्राऊंड डान्सर्ससोबत लिपलॉक करून चर्चेत आली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : लास वेगासमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स कार्यक्रमात ५५ वर्षीय अमेरिकन गायिका जेनिफर लोपेझने पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स जितका गाजला, त्याहून अधिक चर्चेत आली ती तिची एक वादग्रस्त कृती, स्टेजवर बॅकग्राऊंड डान्सर्ससोबत केलेले ‘लिपलॉक’!
ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. कार्यक्रमादरम्यान सुमारे सहा मिनिटांचा परफॉर्मन्स करताना जेनिफरने महिला आणि पुरुष डान्सर्ससोबत एका पाठोपाठ एक लिपलॉक करत सर्वांना चकित केलं. तिच्या या धक्कादायक कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
लाईव्ह परफॉर्मन्समध्ये 55 वर्षीय गायिकेचं शॉकिंग लिपलॉक
जेनिफरने तिच्या सुपरहिट गाण्यांवर दमदार परफॉर्मन्स केला, पण स्टेजवरील त्या एका क्षणाने संपूर्ण कार्यक्रमाच्या चर्चा दुसऱ्याच दिशेने वळवल्या. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या परफॉर्मन्सवर टीकेचा सूर लावला आहे. काहींनी म्हटलं, “वय लपवण्याचा आणि चर्चेत राहण्याचा आटोकाट प्रयत्न,” तर काही म्हणाले, “हे मनोरंजन आहे की अतिरेक?” एका युजरने चक्क लिहिलं, “लक्ष वेधण्यासाठी काहीही करायचं का? आता तुम्ही ५० च्या पुढे गेलात, तरी स्वतःला किशोरवयीन समजायचं थांबवा.” दुसऱ्याने म्हटलं, “टॅलेंट संपल्यावर उरतो असा स्टंटच.”
advertisement
नेटकऱ्यांनी फक्त तिच्या कृतीवरच नव्हे, तर समाजावर होणाऱ्या परिणामांवरही भाष्य केलं. “आम्ही पुढच्या पिढ्यांना काय दाखवतोय?” असा संतप्त सवाल काहींनी उपस्थित केला आहे. काहींनी कोविडसारख्या संसर्गजन्य रोगांची आठवण करून दिली आणि असे स्टंट टाळा, असं स्पष्ट सांगितलं.
advertisement
advertisement
चार लग्न अन् चार घटस्फोटांमुळे नेहमीच चर्चेत
जेनिफर लोपेझने आतापर्यंत चार विवाह केले असून त्यातील सर्व घटस्फोटात संपले. १९९७ ला जेनिफरने ओजानी नोआबरोबर लग्न केले. १९९८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २००१ मध्ये तिने क्रिस जूडबरोबर लग्नगाठ बांधली आणि २००३ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर तिने मार्क अँथोनीबरोबर २००४ मध्ये लग्नगाठ बांधली होती; मात्र त्यांचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. २०२२ मध्ये तिने बेन एफ्लेकबरोबर लग्न केले. पण त्यांनी नुकताच २०२५ मध्ये घटस्फोट घेतला आहे.
advertisement
लोकप्रियता टिकवण्यासाठी केला अश्लील स्टंट?
जेनिफर लोपेझ हे नाव एकेकाळी सुपरहिट गाण्यांमुळे, अभिनयामुळे ओळखलं जायचं. पण आता तिची ओळख वादग्रस्त स्टेज अॅक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यातील अपयशी नात्यांमुळे होत आहे, असं चाहत्यांचं मत आहे. जगभरातल्या कलाकारांसाठी जेनिफर लोपेझ हे एक मोठं नाव आहे, पण तिच्या अलीकडच्या वागणुकीमुळे आता तिच्या चाहत्यांमध्येच नाराजीचं वातावरण आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2025 3:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
4 लग्न, 4 घटस्फोट... आता चर्चेत राहण्यासाठी गायिकेचे अश्लील स्टंट? लाईव्ह शोमधील लिपलॉक व्हायरल