संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद, करिश्माच्या मुलांनी मागितला वाटा, सावत्र आईवर गंभीर आरोप
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
करिश्मा कपूरच्या मुलांनी संजय कपूरच्या ३० हजार कोटी संपत्तीमध्ये वाटा मागत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रिया सचदेववर गंभीर आरोप झाले आहेत.
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरचा पती आणि प्रसिद्ध व्यावसायिक संजय कपूर यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. पण, आता त्यांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून एक मोठा वाद सुरू झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात तणावाचं वातावरण आहे. आता या वादात करिश्मा कपूरच्या मुलांनीही उडी घेतली आहे, ज्यामुळे हे प्रकरण आणखीच तापलं आहे.
वडिलांच्या संपत्तीत मागितला वाटा
समायरा आणि किआन या करिश्मा कपूरच्या मुलांनी त्यांच्या दिवंगत वडिलांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, मुलांनी कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी २१ मार्च २०२५ रोजी संजय कपूर यांनी केलेली विल संशयास्पद आणि खोटी असल्याचा आरोप केला आहे.
advertisement
सावत्र आईवर गंभीर आरोप!
तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की संजय कपूर यांनी मृत्युपत्राचा उल्लेख केला नाही किंवा त्यांची सावत्र आई प्रिया कपूर किंवा इतर कोणीही त्यांना या मृत्यूपत्राबाबत कधीही माहिती दिली नाही. प्रियाच्या वर्तनावरून असे दिसून येते की कथित मृत्युपत्र तिनेच बनवले होते, असा आरोप त्यात करण्यात आला आहे.
advertisement
STORY | Actor Karisma Kapoor's kids move Delhi HC for share in late father's property
The two children of Bollywood actor Karisma Kapoor on Tuesday moved the Delhi High Court seeking share in their late father Sunjay Kapur's property. The plaint, which is likely to come up for… pic.twitter.com/75FqYq4VX2
— Press Trust of India (@PTI_News) September 9, 2025
advertisement
संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची आई राणी कपूर आणि दुसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्यातही संपत्तीवरून वाद सुरू आहे. याच वादात आता मुलांनीही उडी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या सौतेल्या आईवर म्हणजेच प्रिया सचदेववर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे प्रियाचीही अडचण वाढली आहे. या याचिकेवर १० सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 4:10 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद, करिश्माच्या मुलांनी मागितला वाटा, सावत्र आईवर गंभीर आरोप