advertisement

प्रसिद्ध अभिनेत्रीचं ब्रेन कॅन्सरनं निधन, वयाच्या 33व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Last Updated:

Actress Death : अभिनेत्रीच्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीनं अवघ्या 33व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

News18
News18
मुंबई : मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीनं वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीला दुर्मिळ ब्रेन कॅन्सर झाला होता. अभिनेत्रीवर उपचार सुरू होते. पण उपचारांती तिची मृत्यू झाला आहे. तिच्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
Walking Dead या लोकप्रिय हॉलिवूड वेब सीरिजमधून अभिनेत्री केली मॅकनं या जगाचा निरोप घेतला. केलीच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी लिहिलं, "हे सांगताना खूप दु:ख होत आहे की आमची प्रिय केली आता आपल्यात नाही. ती सर्वांना सोडून कायमची निघून गेली आहे."
advertisement

मेंदूच्या कर्करोगामुळे झाला मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, केली मॅक ग्लिओमा नावाच्या मेंदूच्या कर्करोगाने (brain cancer) ग्रस्त होती. याच आजारामुळे तिचं Cincinnati अमेरिका येथे निधन झालं. केलीचा जन्म 10 जुलै 1992 रोजी झाला होता. केलीने अगदी लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. कमी वेळातच तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने हॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. तिच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement

Walking Dead मुळे मिळाली लोकप्रियता

केलीने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केलं होतं. Walking Dead या वेब सीरिजमुळे तिला खरी ओळख मिळाली. याशिवाय तिने 9-1-1 Chicago, Scold the Modern Family यासारख्या प्रोजेक्ट्समधील तिच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

हॉलिवूडमध्ये शोकसागर

केली मॅकच्या अकाली निधनामुळे हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये दुःखाचं वातावरण आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तिचं नाव आणि काम अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहील.
advertisement

काय आहे ग्लिओमा 

ग्लिओमा हा एक ब्रेन ट्यूमर आहे जो हळूहळू पाठीच्या कण्यापर्यंत पसरतो आणि नंतर मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यात असलेल्या पेशी मेंदूच्या न्यूरॉन्सना आधार आणि संरक्षण देतात परंतु जेव्हा ते असामान्यपणे वाढू लागतात तेव्हा ते ट्यूमरचे रूप धारण करतात.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रसिद्ध अभिनेत्रीचं ब्रेन कॅन्सरनं निधन, वयाच्या 33व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement