advertisement

सुधीर फडकेंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर; भूमिकेबद्दल सुनील बर्वे असं काही म्हणाला.., Video

Last Updated:

सुधीर फडके यांची भूमिका चित्रपटामध्ये साकारताना थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले. नट म्हणून कन्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करावं लागलं, असं अभिनेता सुनील बर्वे यांनी सांगितलं.

+
स्वरगंधर्व

स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर, अभिनेता सुनील बर्वे म्हणतोय मी खूप शिकलो, Video

साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : आपल्या चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज, अविस्मरणीय असे अनमोल हिरे होऊन गेले आहेत. त्यापैकीच एक होते बाबूजी म्हणजेच सुधीर फडके होय. या ख्यातनाम गायक आणि संगीतकाराची आयुष्याची कहाणी आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येत आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट 1 मे पासून सर्वांना पुन्हा एकदा बाबूजींच्या दुनियेत घेऊन जात आहे. अभिनेता सुनील बर्वे याने बाबूजींची भूमिका या चित्रपटात साकारली आहे.
advertisement
खरंतर आपली पहाट सुधीर फडके यांनी गायिलेल्या भावगीते आणि भक्तिगीतांनी होते. तर सुधीरजींच्याच आवाजातील चित्रपटगीतांनी आपले मन अजूनच ताजेतवाने होत असते. महाकवी ग. दी. माडगूळकर यांनी रचलेल्या गीतरामायणाला बाबूजींच्या आवाजाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आजही ते प्रत्येक संगीतरसिकाच्या मनात घर करून आहे. अशा दिग्गज व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणे, हे भाग्य लाभल्याचे मत अभिनेता सुनील बर्वे याने कोल्हापुरात न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
advertisement
25 जुलै 1919 ला जन्मलेल्या सुधीरजींचे म्हणजेच रामचंद्र विनायक फडके यांचे अवघे बालपण कोल्हापुरातच गेले. वाडाफणसे या मूळ कोकणातील गावचे हे फडके कुटुंब कोल्हापुरात येवून वसले होते. कोल्हापुरच्याच कै. वामनराव पाध्ये यांच्याकडे बाबूजींचे शास्त्रीय गायनातील प्राथमिक शिक्षण घेतले होते. मात्र सुधीर फडके आणि कोल्हापूर यांच्याबाबतच्या बऱ्याचशा गोष्टी या चित्रपटाच्या निमित्ताने मला समजल्या, असे सुनील बर्वे यांनी सांगितले.
advertisement
सुधीर फडके यांची भूमिका चित्रपटामध्ये साकारताना थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले. नट म्हणून कन्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करावं लागलं. त्यामुळे अर्थातच त्यांच्याबद्दलची लिखित माहिती त्यांचे युट्युब व्हिडीओ पाहणे, हे या चित्रपटाच्या निमित्ताने झाले आहे. या करवीर नगरीतून इतक्या मोठमोठ्या दिग्गज व्यक्तींचा इथे जन्म झालेला आहे. चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात तर अनेक व्यक्तींनी कोल्हापूरमध्ये त्यांचा उदयाचा काळ घालविलेला आहे. अशा या कोल्हापूर नगरीतीलच बाबूजी देखील असल्याचा आनंद होतोय, असे मत सुनील बर्वे यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
चित्रपटामुळे खूप काही शिकायला मिळालं
सुधीर फडके यांच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सुनील बर्वे हे निवेदक होते, अशी आठवण देखील बर्वेंनी सांगितली. तर बायोपिकच्या या काळात कोणत्याही बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करायला मिळेल, अशी शक्यता देखील वाटली नव्हती, अंसही सुनील बर्वे यांनी बोलून दाखवले. दरम्यान, ही एक म्युजिकल बायोपिक असल्यामुळे संगीताबद्दल भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. बाबूजींची गाणी ते कसे गायचे? त्यांच्या हालचाली, गाण्याबरोबर त्यांचे हावभाव कसे व्हायचे? हे सुद्धा अभ्यासता आले आणि मुळात त्यांचा गाण्यातील तरलपणा आणि सुंदरता ही अंगिकारली पाहिजे, असं वाटून गेले. त्यामुळे माझा रियाजही वाढला. त्यामुळेच मी सुद्धा बरेच काह शिकलो, असेही बर्वे यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
दरम्यान, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच या चित्रपटाची क्रेझ संगीत प्रेमींमध्ये वाढलेली पहायला मिळत होती. त्यामुळे हा चित्रपट चित्रपट गृहातच जाऊन पाहण्याचे आवाहन दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
सुधीर फडकेंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर; भूमिकेबद्दल सुनील बर्वे असं काही म्हणाला.., Video
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement