advertisement

Mrunal Thakur Wedding: व्हेलेंटाईन डेच्या दिवशी मृणाल ठाकूर धनुषसोबत लग्न करणार? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं

Last Updated:

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धनुष आणि मृणाल ठाकूरच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. धनुषसोबतच्या लग्नाबद्दल स्वत: मृणालने प्रतिक्रिया दिली आहे.

News18
News18
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धनुष आणि मृणाल ठाकूरच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. अनेक मिडिया रिपोर्ट्समध्ये धनुष आणि मृणाल येत्या 14 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सुरू आहे. धनुषसोबतच्या लग्नाबद्दल स्वत: मृणालने प्रतिक्रिया दिली आहे. तिनेच तिच्या लग्नाबद्दलचं सत्य सांगितलं आहे. नेमकं मृणाल तिच्या लग्नाबद्दल काय म्हणाली आहे, जाणून घेऊया...
मृणाल ठाकूरने धनुषसोबतच्या नात्याबद्दल वारंवार स्पष्टीकरण दिले आहे. पण यावेळी नेटकऱ्यांनी त्यांच्या लग्नाचं सूतच जुळवलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी (14 फेब्रुवारी) ती खरोखरच धनुषशी लग्न करणार आहे का असे विचारले असता, अभिनेत्रीने एबीपीसोबत बोलताना लग्नाबद्दल म्हणाली की, , "सोशल मीडियावर तर आमच्या लग्नाची तारीख सुद्धा आली आहे. पण मलाच कोणी आमंत्रण दिले नाही. किमान मला तरी सांगायचं." सोशल मीडियावर सुरू असलेल्या लग्नाच्या अफवेच्या बातम्या तू पाहतेय नाही? असा प्रश्न पत्रकाराने अभिनेत्रीला विचारला. या प्रश्नावर अभिनेत्रीने मिश्किल उत्तर दिलंय.
advertisement
मृणाल म्हणाली की, "होय, मी त्या बातम्या पाहतेय. त्या बातम्या पाहून खरंतर मला हसू येतं. जे माझं फुकट पीआर करतायत, त्यांचे मी आभार मानेल. पण तुम्हाला जे वाटतंय तसं काहीच नाही. 14 फेब्रुवारीला तुम्ही पाहाल काय होतंय आणि काय नाही ते" अभिनेत्रीला विचारण्यात आले की तू प्रेमात पडलीये का? तर तिने हसून उत्तर देत म्हणाली की, हा एक वैयक्तिक प्रश्न आहे. "नाही अरे... माझ्या लग्नाचं आमंत्रण मी सर्वात पहिले गणरायाला आणि प्रेक्षकांना देईल." मृणालच्या लग्नाच्या अफवा येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तिचे नाव बादशाह, शरद त्रिपाठी, अर्जित तनेजा, कुशल टंडन आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याशी जोडले गेले होते.
advertisement
काही महिन्यांपूर्वी तिचं नाव क्रिकेटपटू श्रेयस अय्यरशी जोडले गेले होते. पण त्या प्रत्येक वेळी अफवाच ठरल्या. येत्या 14 फेब्रुवारीला तरी मृणाल- धनुष लग्न करणार का? याची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. सिद्धांत चतुर्वेदीसोबत "दो दिवाने सहर में" या चित्रपटातून मृणाल ठाकूर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 20 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mrunal Thakur Wedding: व्हेलेंटाईन डेच्या दिवशी मृणाल ठाकूर धनुषसोबत लग्न करणार? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement