'मुझसे शादी करोगी'वर निक जोनसने लगावले ठुमके; डान्सपाहून प्रियंकाचे फॅन्सही वेडे, म्हणाले 'बेस्ट जीजू ऑफ द इयर'

Last Updated:

जेव्हा बॉलिवूडचं गाणं आणि निक जोनासचे विदेशी ठुमके एकत्र येतात, तेव्हा इंटरनेटवर राडा तर होणारच! प्रियांका चोप्राच्या पतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

निक जोनस
निक जोनस
मुंबई : आपल्यापैकी अनेकजण लग्नसमारंभात किंवा पार्टीत जेव्हा 'देसी गर्ल' किंवा 'मुझसे शादी करोगी' सारखी गाणी ऐकतो, तेव्हा पाय आपोआप थिरकायला लागतात. बॉलिवूडच्या गाण्यांची जादूच अशी आहे की, भाषेची बंधनं तोडून ती सातासमुद्रापार पोहोचतात. पण विचार करा, जर हेच गाणं अमेरिकेत वाजत असेल आणि चक्क प्रियांका चोप्राचा नवरा म्हणजेच आपले 'इंटरनॅशनल जिजू' निक जोनास त्यावर डान्स करत असतील तर? सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ फिरतोय, जो पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.
व्हायरल व्हिडिओमध्ये निक जोनास आपले भाऊ जो आणि केविन जोनास यांच्यासोबत स्टेजच्या मागे मस्ती करताना दिसत आहे. बॅकग्राउंडला बॉलिवूडचं आयकॉनिक गाणं 'मुझसे शादी करोगी' वाजतंय. हे गाणं लागताच निक स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने अस्सल भारतीय स्टाईलमध्ये ठुमके मारायला सुरुवात केली. हा कोणताही प्लॅन्ड व्हिडिओ नव्हता, तर शो सुरू होण्यापूर्वीची एक शुद्ध मौज-मस्ती होती, जी फॅन्सच्या काळजाला भिडली आहे.
advertisement
31 डिसेंबर, इंस्टाग्राम आणि जोनास ब्रदर्सचा राडा
निकने हा व्हिडिओ 31 डिसेंबरला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता. व्हिडिओमध्ये निक डान्स करण्यात मग्न आहे, केविनही त्याला साथ देतोय, पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते जो जोनासने! जो समोर उभा राहून अतिशय शांतपणे 'केळं' खाताना दिसतोय. एका बाजूला निकचा डान्स आणि दुसऱ्या बाजूला जोची ही 'कुलनेस' पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.
advertisement
प्रियांकाने शेअर केला आणि इंटरनेटवर आग लागली
निकने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आणखी एक शो म्हणजे माझ्या आवडत्या हिंदी गाजलेल्या गाण्यांवर लोकांना शिक्षित करणारी आणखी एक रात्र." पण खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ तेव्हा व्हायरल झाला जेव्हा 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने तो आपल्या प्रोफाइलवर शेअर केला. मग काय? देसी इंटरनेट युजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)



advertisement
'आता काय मतदान ओळखपत्र घेऊनच मानणार का?'
नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलं, "हा मुलगा प्रियांकाच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालाय", तर दुसऱ्याने गंमतीने विचारलं, "जिजू, आता काय भारताचे व्होटिंग राईट्स घेऊनच मानणार का?" कोणाचे त्यांना 'जमाई बाबू' म्हटलंय, तर कोणी त्यांना 'बेस्ट जिजू'चा अवॉर्ड दिला आहे. विशेष म्हणजे, भारतीय संगीताबद्दल निकचं प्रेम पाहून भारतीय चाहत्यांना त्याचा खूप अभिमान वाटत आहे.
advertisement
थोडक्यात सांगायचे तर... निक जोनासने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, भलेही तो सातासमुद्रापार राहणारा असला, तरी त्याचं मन आता पूर्णपणे 'देसी' झालं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मुझसे शादी करोगी'वर निक जोनसने लगावले ठुमके; डान्सपाहून प्रियंकाचे फॅन्सही वेडे, म्हणाले 'बेस्ट जीजू ऑफ द इयर'
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement