advertisement

रिअल आहे O' Romeo ची Love Story; कोण होते हुसैन उस्‍तरा आणि सपना दीदी?

Last Updated:

O' Romeo Real Story : ओ रोमियो ही फिल्म रिअल लाइफ स्टोरीवर आधारित असल्याचं सांगितलं जातं. शाहीद कपूर आणि तृप्ती डिमरी ज्याहुसैन उस्तरा आणि सपना दीदीची भूमिका साकारत आहेत, त्यांच्याबाबत संपूर्ण माहिती.

News18
News18
अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांची 'ओ'रोमियो' ही फिल्म प्रदर्शित झाली आहे. या फिल्ममध्ये शाहीद हुसैन उस्ताराचा भूमिकेत तर तृप्ती सपना दीदीच्या भूमिकेत आहे. ही फिल्म रिअल लाइफ स्टोरीवर आधारित असल्याचं सांगितलं जातं. रिअल लाइफमधले हुसैन उस्तरा आणि सपना दीदी नेमके कोण होते?
'ओ'रोमियो' फिल्मवर आधी हुसैन उस्तराच्या कुटुंबाने नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी फिल्मचे निर्माते विशाल भारद्वाज यांनी ही फिल्म हुसेन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित असल्याचं सागितलं होतं.
उस्‍तरा हा एकेकाळी मुंबईतील एक प्रसिद्ध गुंड होता. प्रत्यक्षात तो पोलिसांचा खबरी होता. ज्या काळात दाऊद इब्राहिमचं नाव ऐकूनच लोक थरथर कापत होते, त्यावेळी उस्ताराने त्याला मारण्याची सुपारी घेतली होती, याचं कारण होतं सपना दीदी.
advertisement
हुसैन आणि सपनाची पहिली भेट
1986 मध्ये सपनाला अशरफ म्हणून ओळखलं जात असे. अशरफचा पती मेहमूद विमानतळावर झालेल्या गोळीबारात मारला गेला. दाऊद इब्राहिमचं हे काम असल्याचं तिला सांगण्यात आलं. जो दुबईतून मुंबई अंडरवर्ल्ड चालवत होता. त्यामुळे अशरफला दाऊदला जीवे मारायचं होतं, हुसेन उस्तरालाही तेच हवं असल्याचं तिला समजलं त्यामुळे ती त्याच्याकडे गेली.
advertisement
उस्तराने तिला शूट करायला शिकवलं. ती अनेक दिवस त्याच्या घरी शूट कसं करायचं हे शिकण्यासाठी येत राहिली. त्याने तिला मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण दिलं जेणेकरून गरज पडल्यास ती लढू शकेल. पुस्तकानुसार, उस्तरा अशरफला या गोष्टी शिकवत असताना, तो तिच्या प्रेमात पडला.
त्याने सुरुवातीला तो खबरी असल्याचं सत्य अशरफला सांगितलं नाही, कारण ती आपल्यापासून दूर जाईल अशी भीती त्याला होती. त्याच्या नेटवर्कने त्याला दाऊद इब्राहिमच्या कारवायांबद्दल माहिती पुरवली. नंतर त्याने आपलं सत्यही अशरफला सांगितला.
advertisement
अशरफची सपना दीदी झाली
उस्ताराकडून प्रशिक्षण घेताना अशरफ इतर स्थानिक डॉनकडून पाठिंबा मिळवत होती. जेव्हा ती गँगस्टरमधून राजकारणी बनलेल्या अरुण गवळीला भेटली तेव्हा तिने तिचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. तिला वाटलं की हिंदू गुंड मुस्लिम महिलांवर सहज विश्वास ठेवत नाहीत. तिने आपलं नाव सपना ठेवलं, कारण दाऊदला मारणं हे तिचं स्वप्न होतं. अशा प्रकारे ती अशरफवरून सपना दीदी बनली.
advertisement
हुसेन उस्तारा सपनाला तिच्या पतीच्या मृत्यूचा बदला घेणारी एक साधी महिला मानत होता. पण सपना लोकल गुंड बनली. हुसेनने सपनाला पटवून दिलं की दाऊदच्या स्थानिक व्यवसायांना हानी पोहोचवल्याने डॉनला नुकसान होईल. म्हणून सपनाने दाऊदच्या प्रत्येक स्थानिक व्यवसायाची तक्रार द्यायची. डान्स बार आणि जुगार अड्ड्यांबद्दल गुन्हे शाखेला माहिती द्यायची.
सपना दीदीवर दोनदा हल्लाही झाला. तरीही ती दाऊदच्या व्यवसायाचं नुकसान करत राहिली. म्हणून सपना दीदी आणि हुसेन उस्तारा यांनी काठमांडूला जाण्याचा निर्णय घेतला, जिथं दाऊदने शस्त्रास्त्रे आणि बनावट चलनांच्या व्यापारासाठी नेपाळचा मार्ग वापरला.
advertisement
सपना आणि हुसैनमधील वाढती जवळीक
सपना आणि हुसेन उस्त्रा काठमांडूच्या प्रवासादरम्यान बराच वेळ एकत्र घालवला. यावेळी सपनाने त्याला उस्‍तरा का म्हटलं जातं, असं विचारलं. हुसेनने सांगितलं की तो 15 वर्षांचा असताना खिसा चोर होता. दररोज त्याला त्याचं चोरीचं सामान टोळीच्या लीडरला द्यावं लागत असे. एके दिवशी हुसेनकडे खूप चोरीचे सामान होते आणि तो ते लपवण्याचा प्रयत्न करत होता. टोळीच्या लीडरला हे कळलं तेव्हा त्याने त्याला मारहाण केली. हुसैनने खिशातून रेझर काढलं आणि टोळी लीडरवर हल्ला करून पळाला. तेव्हापासून त्याला उस्तारा हे नाव पडलं.
advertisement
नेपाळच्या एका ट्रिप दरम्यान त्यांची भेट एका स्थानिक टोळीशी झाली. याच ट्रिपमध्ये त्यांनी त्यांना एकमेकांची काळजी असल्याचं कबुल केलं.
सपना आणि हुसैनच्या लव्ह स्टोरीचा असा झाला एंड
डिसेंबर 1991 मध्ये काही गुंड सपनाचा पाठलाग करत असल्याने ती अचानक हुसेनच्या घरात शिरली. असं म्हटलं जातं की हुसैनने सुरुवातीला तिला धीर दिला आणि सांत्वन दिलं, पण नंतर तिच्याशी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे सपनाने त्याला फटकारलं. त्यांच्यात वाद झाला. उस्तारा तिला नको नको ते बोलला आणि सपना त्याच्या कानशिलात लगावून तिथून निघून गेली. इथं त्यांची कहाणी संपली.
यानंतर सपनाचं स्वप्न दाऊदला मारण्याचं. तिने एकदा काही लोकांना लाच देऊन एक मोठा प्लॅन केला. शारजाहमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचदरम्यान दाऊदला मारण्याचा प्लॅन होता. पण डी-कंपनीला हे कळलं आणि 1994 मध्ये दाऊद इब्राहिमने सपनाला मारलं. काही वर्षांनी 1998 मध्ये हुसैन उस्ताराचीही मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
रिअल आहे O' Romeo ची Love Story; कोण होते हुसैन उस्‍तरा आणि सपना दीदी?
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement