लग्न न करता 40 वर्ष एकत्र राहिले,लेखिका अमृता प्रीतम यांच्या इमरोज यांचं निधन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अमृता आणि इमरोज यांची अद्धभूत प्रेम कहाणीचा आज अखेर झाला. दोघांची प्रेम कहाणी एखाद्या मोठ्या पडद्यावरील सिनेमाच्या कथेप्रमाणे होती.
मुंबई, 22 डिसेंबर : प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज याचं निधन झालं आहे. वयाच्या 97व्या वर्षी त्यांनी त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे निधन झालं आहे. इमरोज यांचं खरं नाव हे इंद्रजीत सिंह असं आहे. इमरोज अमृता प्रीतम यांच्याबरोबर असलेल्या नात्यानंतर खूप लोकप्रिय झाले होते. दोघांनी आजवर लग्न केलं नाही पण जवळपास 40 वर्ष ते एकमेकांबरोबर राहिले.
अमृता आणि इमरोज यांच्या अद्धभूत प्रेम कहाणीचा आज अखेर झाला. दोघांची प्रेम कहाणी एखाद्या मोठ्या पडद्यावरील सिनेमाच्या कथेप्रमाणे होती. अमृता त्यांना जीत नावानं हाक मारायची. इमरोज यांच्या निधनावर साहित्य जगतात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - थोरला सुपरस्टार पण धाकटा ठरला सुपरफ्लॉप! स्टारकिड असून 10 वर्षांपासून स्ट्रगल करतोय 'हा' अभिनेता
advertisement
इमरोज यांचा जन्म 1926 साली लाहौरपासून 100 किलोमीटरवर असलेल्या एका गावात झाला. इमरोज यांनी जगजीत सिंग यांच्या 'बिरदा दा सुल्तान' आणि बीबी नूरन यांच्या कुली रह विच सारख्या अनेक प्रसिद्ध एलपीचे कव्हर डिझाइन केले होते.
एका कलाकाराच्या माध्यमातून इमरोज आणि अमृता यांची भेट झाली. त्यावेळस अमृता त्यांच्या पुस्तकाचं कव्हर डिझाइन करत होती.त्याच काळात ती कोणाची तरी वाटही पाहत होती. अमृता प्रीतम यांनी पंजाबी आणि हिंदी भाषेत अनेक कविता आणि कांदबरी लिहिल्या आहेत. 100 हून अधिक पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. पांच बरस लंबी सड़क, पिंजर, अदालत, कोरे कागज, उन्चास दिन, सागर आणि सीपियां ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तकं आहेत.
advertisement
1935 साली अमृताचं लग्न लाहौरच्या बिझनेसमन प्रीतम सिंहबरोबर झालं होतं. दोघांना 2 मुलंही झाली. 1960 साली तिनं नवऱ्याला सोडलं. त्यानंतर अमृता प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्या प्रेमात पडली. पण साहिर यांच्या आयुष्यात एक मुलगी आल्यानं यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. असं म्हणतात की अमृता नेहमी आपल्या बोटांनी साहिर यांचं नाव इमरोज यांच्या पाठीवर लिहायची. ती नेहमी म्हणायची की साहिर माझ्या आयुष्याचं आकाश आहे आणि इमरोज माझ्या घराचं छप्पर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 22, 2023 1:57 PM IST