Guess Who : बालपणीच सुरू केली एक्टिंग, लेस्बियन किसिंग सीनमुळे आली चर्चेत, फोटोतील ही मराठी अभिनेत्री कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Guess Who : फोटोमध्ये दिसणारी क्यूट चिमुकली मराठीतील टॉपची अभिनेत्री आहे. मराठी मालिका, रंगभूमी आणि सिनेमा अशा तिनही माध्यमांमध्ये ती सक्रीय असते.
मुंबई : सेलिब्रेटींच्या बालपणीचे फोटो ते अनेकदा शेअर करत असतात. सगळेच बालपणी खूपच क्यूट आणि निरागस असतात. पण असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे बालपणीचे फोटो आणि आताचे ते यांच्यात खूप फरक जाणवतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या चिमुकल्या मुलीच्या बाबतीतही असंच झालं आहे. फोटोतील ही चिमुकली मुलगी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कोण आहे ही! तुम्ही ओळखलं का?
फोटोमध्ये दिसणारी क्यूट चिमुकली मराठीतील टॉपची अभिनेत्री आहे. मराठी मालिका, रंगभूमी आणि सिनेमा अशा तिनही माध्यमांमध्ये ती सक्रीय असते. फोटोत मॅगझिन हातात घेऊन बसलेल्या या मुलीने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम करायला सुरूवात केली. बालपणीच तिनं दर्जेदार कलाकृतीत काम केलं. मोठ्या झाल्यानंतरही तिने तिच्या कामाची पोचपावती मिळवली. तिच्या एका धाडसी सीनमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.
advertisement
फोटोमध्ये दिसणारी या मुलीचा नुकताच एक मराठी सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री प्रिया बापट आहे. प्रिया बापटने अनेकदा तिच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. त्यातीलच तिचा हा एक फोटो आहे.
advertisement
प्रिया बापटचा जन्म 18 सप्टेंबर 1986 साली झाला. प्रियाचं संपूर्ण बालपण मुंबईच्या दादरमध्ये गेलं. मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी सिनेमांत तिने बालकलाकार म्हणून काम केलं. दे धमाल, आभाळमाया सारख्या मराठी मालिकेतही तिनं बालकलाकार म्हणून काम केलं आहे. पुढे शुभं करोति, अधुरी एक कहाणी सारख्या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत झळकली. नवा गडी नवं राज्य, वाटेवरती काचा गं सारख्या नाटकात तिने काम केलं. दादा एक गुड न्यूज आहे हे तिची निर्मिती असलेलं पहिलं मराठी नाटक आहे. टाइमपास 2, हॅप्पी जर्नी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सारखे तिचे गाजलेले सिनेमे आहेत.
advertisement
अभिनय क्षेत्रात काम करत असताना प्रियाने एक धाडसी निर्णय घेतला होता. प्रिया बापटने ओटीटी माध्यमातही आपल्या अभिनयाची छाप पाडली. तिने सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये खळबळ उडवून दिली होती. या सीरिजमध्ये तिने लेस्बियन किसिंग सीन दिला होता. हा सीन प्रचंड चर्चेत आला होता. या सीनमुळे प्रिया प्रचंड त्रास झाला होता. लेस्बियन किसिंग व्हायरल झाल्यानंतर ती दोन दिवस रडत होती, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 6:01 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Guess Who : बालपणीच सुरू केली एक्टिंग, लेस्बियन किसिंग सीनमुळे आली चर्चेत, फोटोतील ही मराठी अभिनेत्री कोण?