advertisement

'कालपर्यंत भोग विलास...' ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर नियुक्त करण्यावर रामदेव बाबा संतापले

Last Updated:

ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवण्यावर अनेक संतांनी आक्षेप घेतला आहे. आता रामदेव बाबा यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवण्यावर रामदेव बाबांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवण्यावर रामदेव बाबांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ramdev Baba On Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीने ९०चं दशक गाजवलं होतं. अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मात्र २००० मध्ये ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर अभिनेत्रीने देश सोडण्याचा निर्णय घेतला. ‘करण अर्जुन’, ‘बाजी’ सारखे दमदार चित्रपट बॉलिवूडला देणारी प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी 25 वर्षांनी भारतात आली. यानंतर ती पुन्हा चित्रपटात काम करणार असे तिच्या चाहत्यांना वाटत असतानाच तिने ती संन्यास घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर तिच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला.
भारतात येताच ममताने प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात हजेरी लावली होती. ममताने महाकुंभात जाऊन संन्यास घेतला. इतकंच नाही, तर ती आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. किन्नर आखाड्याचे अध्यक्ष लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी तिला दीक्षा दिली. पण यावर अनेक संतांनी आक्षेप घेतला आहे. ममताला अशाप्रकारे महामंडलेश्वर ही दीक्षा कशी काय दिली जाऊ शकते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आता रामदेव बाबा यांनीही या प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
रामदेव म्हणाले, "सनातनचा महान कुंभ उत्सव, जिथे आपली मुळे जोडली गेली आहेत. हा एक भव्य उत्सव आहे. हा एक पवित्र सण आहे. पण काही लोक कुंभाच्या नावाखाली अश्लीलता, नशा आणि अयोग्य वर्तन यांचा प्रसार करत आहेत. हे महाकुंभाचे वास्तविक सार नाही. अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जे लोक कालपर्यंत ऐहिक सुखात गुंतलेले होते ते एका दिवसात अचानक संत होतात किंवा महामंडलेश्वर अशी पदवीही मिळवतात.
advertisement
बाबा रामदेव पुढे म्हणाले, 'कोणालाही महामंडलेश्वर करणं, कोणाच्याही नावापुढे बाबा लिहणं, कुंभाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारच्या क्षुल्लक कामांना प्रोत्साहन देणं आणि लोकांपर्यंत पोचणं योग्य नाही. खरा कुंभ म्हणजे जिथे माणूस मानवतेपासून देवत्वाकडे, ऋषीत्वाकडे आणि ब्रह्मत्वाकडे जाऊ शकतो. सनातन अनुभवणे, सनातन जगणे आणि सनातन वाढवणे ही एक गोष्ट आहे, पण सनातनच्या नावाने काही छोटे शब्द बोलायचे, ते सनातन नाही. सनातन हे शाश्वत सत्य आहे, जे नाकारता येत नाही.
advertisement
चित्रपट अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्याबद्दल बाबा रामदेव म्हणाले, 'कोणीही एका दिवसात संतत्व मिळवू शकत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे सराव करावा लागतो. हे संतपद प्राप्त करण्यासाठी आपल्याला 50-50 वर्षांची तपश्चर्या लागली आहे. याला संतत्व म्हणतात. संत होणे ही मोठी गोष्ट आहे. महामंडलेश्वर होणे हे फार मोठे तत्व आहे. आजकाल कोणीही डोकं धरून महामंडलेश्वरात रूपांतरित झालेले पाहतो. असे होऊ नये.'
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'कालपर्यंत भोग विलास...' ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर नियुक्त करण्यावर रामदेव बाबा संतापले
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement