'मी 9 वर्षांचा असताना पहिली गाडी घेतली', सचिन पिळगांवकरांचा किस्सा ऐकून लेक श्रियालाही आवरलं नाही हसू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sachin Pilgaonkar : एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सचिन पिळगांवकर यांनी सांगितलेला एक किस्सा ऐकून लेक श्रिया पिळगांवकरला हसू आवरलेलं नाही.
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मधल्या काळात अनेक मुलाखती दिल्यात. या मुलाखतींमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील, सिनेमांतील अनेक किस्से सांगितले. त्यांच्या किस्स्यांमुळे अनेकदा त्यांच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली. सचिन पिळगांवकर यांचा असाच एक किस्सा समोर आला आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सचिन पिळगांवकर यांनी सांगितलेला एक किस्सा ऐकून लेक श्रिया पिळगांवकरला हसू आवरलेलं नाही.
advertisement
सचिन पिळगांवकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांना बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार देखील देण्यात आला. सचिन यांनी त्याच्या वयाच्या नवव्या वर्षी त्यांची पहिली गाडी खरेदी केली होती. Mashable India सोबत शूट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी हा किस्सा सांगितला.
advertisement
सचिन पिळगांवकर म्हणाले, "मी नऊ वर्षांचा होता, आपण आता ज्या सी लींकवरून जातोय तेव्हा हा सी लिंक नव्हता. मी दादरच्या टायकलवाडीमध्ये राहायचो. टायकलवाडी शिवाजी पार्क एरियामध्ये येते. टायकलवाडीमध्ये मी जेव्हा 9 वर्षांचा होतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा गाडी खरेदी केली होती. मॉरिस माइनर कार होती ती." सचिन यांचं हे वाक्य ऐकून मुलाखत घेणारा आणि श्रिया पिळगांवकर हसले. दोघांनी एकमेकांना प्रश्नार्थक खूण केली.
advertisement
त्यानंतर सचिन पिळगांवकर म्हणाले, "मॉरिस माइनरला बेबी हिंदुस्तान म्हणायचे." मुलाखत घेणाऱ्याने पुन्हा विचारलं, ही पूर्ण गाडी आहे. त्यावर पिळगांवकर म्हणाले, "हा छोटी गाडी". यावर मुलाखत घेणारा आणि श्रिया हसले. पिळगांवकर यांनी पुढे गाडी कशी होती हे सांगितलं. ते म्हणाले, "गाडीला चार दरवाजे, बकेट सीट आणि फ्लोअर शिफ्ट गिअर होते. ही गाडीच होती. तिला टायगरही म्हणायचे. ही पेट्रोलवर धावणारी गाडी होती."
advertisement
पिळगांवकरांचं हे बोलणं ऐकून मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, "मग तुम्ही गाडी चालवायचा कधी?" त्यावर पिळगांवकर म्हणाली, "तेव्हा ड्रायव्हर होता. गाडी चालवण्याची परवानगी नव्हती. मी 9 वर्षांचा होतो तेव्हा वरळी सीफेसरवर त्याच कारमधून गाडी चालवायला शिकलो."
advertisement
तुम्ही 9 वर्षांचे होता तेव्हा तुम्ही किती फिल्म्स केल्या होत्या ? या प्रश्नाचं उत्तर देत सचिन पिळगांवकर म्हणाले, "मी जेव्हा 16 वर्षाचा होता तेव्हा मी 65 सिनेमे केले होते." यानंतर श्रिया आणि मुलाखत घेणारा पुन्हा एकदा हसायला लागले. श्रिया हसत हसत म्हणाली, "मी उतरू का, मला सोडून द्या." सचिन पिळगांवकरांचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 3:57 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी 9 वर्षांचा असताना पहिली गाडी घेतली', सचिन पिळगांवकरांचा किस्सा ऐकून लेक श्रियालाही आवरलं नाही हसू


