advertisement

Saif Ali Khan : सैफची फास्टेट रिकव्हरी! ऑपरेशननंतर 17 दिवसांत कार्यक्रमात दिसला, नेटकऱ्यांकडून हल्ल्यावर प्रश्नचिन्ह!

Last Updated:

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खान लवकरच नेटफ्लिक्सच्या अ‍ॅक्शन थ्रिलर फिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता सैफ अली खान लवकरच नेटफ्लिक्सच्या अ‍ॅक्शन थ्रिलर फिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेता सैफ अली खान लवकरच नेटफ्लिक्सच्या अ‍ॅक्शन थ्रिलर फिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : गेल्या महिन्यातच अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात अभिनेत्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. सैफ या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता, त्यावर काही शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. सैफवर झालेल्या या हल्ल्यानंतर मनोरंजन विश्वासह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणी अजूनही पोलिस तपास करत असून हा हल्ला का झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अशातच अभिनेता सैफ अली खान लवकरच नेटफ्लिक्सच्या अ‍ॅक्शन थ्रिलर फिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ज्वेल थीफ' मध्ये सैफ अली खान आणि जयदीप अहलावत आमनेसामने येणार आहेत. आज या फिल्मचा टीझर लॉन्च झाला आहे. या कार्यक्रमासाठी फिल्ममधील मुख्य कलाकारांनी हजेरी लावली. यात सैफ अली खानचाही समावेश होता. हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सैफ एखाद्या कार्यक्रमात सहभागी झाला आहे.
advertisement
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते आणि त्याला काही दिवसांसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला होता. अशा स्थितीत त्याला या कार्यक्रमात पाहून सगळेच थक्क झाले आहेत. यावेळी सैफ एकदम फिट वाटत होता. त्याच्या उपस्थितीवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
advertisement
advertisement
अनेकजणांना सैफला पाहून आनंद झाला, तर काहींना त्याला पाहून आश्चर्य वाटले. सोशल मीडियावर नेटकरी म्हणत आहेत की सैफ इतक्या लवकर बरा कसा झाला? एकाने कमेंट करत म्हटलं आहे, "ही सर्वांत फास्ट रिकव्हरी आहे." तर, दुसऱ्याने म्हटलं आहे, "सगळं नाटक होतं. सैफवर कोणताही हल्ला झालेला नाही."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Saif Ali Khan : सैफची फास्टेट रिकव्हरी! ऑपरेशननंतर 17 दिवसांत कार्यक्रमात दिसला, नेटकऱ्यांकडून हल्ल्यावर प्रश्नचिन्ह!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement